Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकरोनामुक्त झालेली महिला एक महिन्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

करोनामुक्त झालेली महिला एक महिन्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | New Delhi –

करोनामुक्त झाल्यानंतर एक महिन्याने दुसर्‍यांदा करोना झालेला रुग्ण आढळून आल्याचा दावा

- Advertisement -

बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयाने केला आहे. बंगळुरूतील हा पहिलाच रुग्ण असल्याचेही रुग्णालयानं म्हटलं आहे. बंगळुरूतील फोर्टीस रुग्णालयानं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार 27 वर्षीय महिलेला दुसर्‍यांदा करोनाचा संसर्ग झाला आहे.

दुसर्‍यांदा करोना पॉझिटिव्ह आढळून आलेली महिलेमध्ये जुलैमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळून आली होती. महिलेला ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर पहिला उपचाराच्या साहाय्यानं करोनातून बरी झाली. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पहिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र, एका महिन्याच्या कालावधीनंतर त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पुन्हा करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, असा दावा रुग्णालयानं केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या