Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

२ मार्च २०१९ च्या शासननिर्णयानुसार ७ व्या वेतन आयोगानुसार लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १० वर्ष २० वर्ष व ३० वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ देण्यात येतात. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ देण्याच्या अनुषंगाने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत या तिनही संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिले होते.

- Advertisement -

संपूर्ण जिल्ह्यातून २१७ प्रस्ताव हे जिल्हा स्तरावर सादर करण्यात आले. या सर्व प्रस्तावांची छानणी करण्यात येऊन संगणक अहर्ता, सेवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण, स्थायित्व प्रमाणपत्र, विभागीय चौकशी, मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवाल यांची पडताळणी करून १५२ प्रस्ताव हे पात्र ठरवण्यात आले. विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्यात येऊन ग्रामपंचायत विभागांतर्गत १५२ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा देण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंदराव पिंगळे, मुख्य लेख व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक गट विकास अधिकारी प्रशांत पवार, लेखाधिकारी रमेश जोंधळे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितीन पवार, गणेश बगड, नंदा रायते, कनिष्ठ लेखाधिकारी केशव खुळे, वरिष्ठ सहायक दिनेश टोपले, अशोक अहिरे व इतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

“आश्वासित प्रगती पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांचे सर्व योजनांमधील कामकाज हे चांगले आहे. जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांमध्ये पुढील काळात देखील सहभाग घेऊन सर्व योजानांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या