Wednesday, April 24, 2024
Homeनगरबेलापुरात सुगंधी पानमसाला व गुटखा पकडला

बेलापुरात सुगंधी पानमसाला व गुटखा पकडला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलीसांनी बेलापूर बु. येथे छापा टाकून सुगंधी तंबाखू गुटखा पानमसाला व टेम्पो असा 5 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकारणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करी व विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी बेलापूर येथील पोलीस पथक पाठवून छापा टाकला. बेलापूर बु. येथील महालगल्ली येथे आरिफ युनूस शेख याच्या राहत्या घरासमोर पोलिसांनी टेम्पो नं. एमएच 14 एचजी 9757 पकडला. त्यात 38 हजार 400 रूपयांचा आठ पांढर्‍या रंगाच्या गोण्यांचे कट्टे, प्रत्येक गोनीत 25 पुडके, प्रिमीयम राज निवास नावाचा सुगंधी पानमसाला मिळून आला.

तर 8 पांढर्‍या गोण्यात 25 पुडके त्यात जाफरानी तंबाखू पुड्या मिळून आल्या. तसेच 10 पांढर्‍या गोण्यात 20 पुडके विमल नावाचा सुगंधी पानमसाला गुटखा मिळून आला. तसेच 20 पुडके टोबॅको तंबाखू मिळून आली. निळया रंगाच्या खोक्यात रजनीगंधा हा सुगंधी पान मसाला तसेच सिल्व्हर रंगाच्या खोक्यात रॉयल जर्दा तंबाखू 112 पाऊच तर गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखू टेम्पोसह मिळून आला. टेम्पोसह एकूण मालाची किंमत 5 लाख 75 हजार इतकी असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.

घटनेनंतर पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोरसे हे पुढील तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिश अशोक पानसंबळ यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रियाज रऊफ शेख (वय 35, रा. महेशगल्ली, बेलापूर), नगर्‍या उर्फ साहिल इरफान इनामदार (वय 22, रा. रामगड, बेलापूर बु.), युसूफ बशीर पिंजारी (वय 32, रा. बेलापूर), मेहबूब इमाम तांबोळी (रा. बेलापूर बु.) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे मानवीय जिवीतास हानिकारक खाद्यपदार्थ साठा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या