Friday, April 26, 2024
Homeनाशिकरस्ते दुरूस्तीस सुरुवात

रस्ते दुरूस्तीस सुरुवात

सातपूर । प्रतिनिधी Satpur

संततधार पापवसामुळे औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याची चाळण झाली असून वाहतूकीला अडचण निर्माण होत आहे. वसाहतीतील रस्त्यांचे प्रलंबित कामे तसेच वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेता ‘निमा’तर्फे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

- Advertisement -

निमाच्या पदाधिकार्‍यांनी शहर अभियंता संजय घुगे यांची भेट घेऊन कामे त्वरित सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता कामांना सुरुवात झाली आहे.

औद्योगिक वसाहतीतील मालवाहू वाहने, कामगारांच्या वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेता वरील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत घुगे यांनी तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात केल्याने औद्योगिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होते आहे.

आज गंगामाई औद्योगिक वसाहत समोर रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूवरील नाले मोकळे करण्यात आले.

यावेळी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास आहेर, संजय महाजन तसेच अंबडसाठी असलेल्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष उत्तम दोंदे, गंगामाई औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष मंगेश बोरसे व मनपा अभियंता बच्छाव, उपअभियंता संजय पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या