अस्वलाचा कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला

jalgaon-digital
1 Min Read

बोरद | वार्ताहर- BORAD

बोरद परिसरात असणार्‍या लाखापूर (Lakhapur) (फॉ.) येथील कुकुट पालन केंद्रावर (Poultry center) अस्वलाने(bear) हल्ला (attacked) केला. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

लाखापूर (फॉ.) येथील माजी पं.स.सदस्य चंदर पवार यांच्या मालकीचे असलेले कुकुटपालन केंद्र आहे. त्यांच्या मालकीच्या असलेल्या शेतजमिनीवर गावालगत असल्याने या ठिकाणी लोकांची वर्दळ नेहमी असते.

त्याचबरोबर या ठिकाणी काही कामगारही आहेत. हे कामगार नियमित स्वरूपाचे आपले काम करीत असताना त्यांना दुपारी २ वाजेच्या सुमारास केंद्राच्या भोवती असलेल्या तारेच्या कुंपणावर अचानक लक्ष गेले असता भले मोठे अस्वल दिसून आले.

हे अस्वल कुंपणाच्या तारा तोडण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोक धावून आले. तेही त्या महाकाय अस्वलाला बघून हादरून गेले. तशाही परिस्थितीत दगडाने त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

परंतु तरीही ते अस्वल जात नव्हते. तेव्हा गावातील काही लोक लाठ्या घेऊन धावले आणि त्याला हुसकवू लागले. तेव्हा ते जागेवरून हलले. सुदैवाने कुणालाही इजा पोहचली नाही. याबाबत पत्रकारांनी तळोदा येथील आर.एफ.ओ. निलेश रोढे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्याचबरोबर मेवासी वनविभाग कार्यालयातील कर्मचारी त्या ठिकाणी पाठविण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *