Thursday, April 25, 2024
Homeनगरबार्शीकर कुटुंबातील दोघांना मारहाण

बार्शीकर कुटुंबातील दोघांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील माजी आमदार नगरभूषण स्व. नवनीतभाई बार्शीकर यांच्या कुटुंबातील सर्वेश स्वरूप बार्शीकर व स्वरूप गोपाळदास बार्शीकर यांना अर्बन बँक चौकातील त्यांच्या दुकानासमोरच मारहाण झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. गाडी लावणे व हॉर्न वाजविण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

अर्बन बँक चौकात बार्शीकर कुटुबियांचे दुकान आहे. या दुकानासमोर सर्वेश व स्वरूप बार्शीकर यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेमध्ये सर्वेश हे जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले

सदर घटना हॉर्न वाजविण्याच्या व गाडी लावण्याच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह कोतवालीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनीही कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या