Thursday, April 25, 2024
Homeजळगावखटोडसह पाच वाळू गटाच्या कंत्राटदारांची बँक गँरंटी जप्त

खटोडसह पाच वाळू गटाच्या कंत्राटदारांची बँक गँरंटी जप्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

अवैध वाळू उपसाविरोधात प्रशासनाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. सर्व वाळू गटातून उपसा झालेल्या वाळूचे मोजमाप होवून लिलावातील अटी शर्तींची देखील तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

खटोड यांच्या श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यासह सहा कंत्राटदारांनी अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांची बँक गॅरंटी जप्तीची कारवाई अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी केली.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करण्यांमुळे नदीपात्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार

वैजनाथ वाळू गटातून अवैध उत्खनन केल्याप्रकरणी अ‍ॅड. विजय पाटील यांनी तक्रार केली होती. त्यावर उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या समितीने वाळू गटाची मोजणी केली होती. वैजनाथ गटामधून 334 ब्रास अवैध वाळू उत्खनन केल्याचे तपासणीत आढळले होते.

खटोड यांना बजाविली होती 80 लाखाच्या दंडाची नोटीस

समितीने वाळू गटाचा अहवाल सादर केल्यानंतर वैजनाथ वाळू गटातून अवैध उत्खनन प्रकरणी लिलावधारक श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे आदित्य खटोड यांना 70 ते 80 लाख रुपयापर्यंत पाचपट दंडाची नोटीस बजावली होती.

तर आव्हानी वाळू गटाच्या लिलावधारकालाही अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.

या वाळू गटांची झाली बँक गॅरंटी जप्त

उत्राण क्रमांक 9 एम.एस. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांची 5 लाख 4 हजार 6 रुपये,

उत्राण गट क्रमांक 17 महेश सदाशिव माळी 2 लाख 51 हजार 660 रुपये,

बांभोरी प्र.चा पटेल ट्रेडींग कंपनी 2 लाख 8 हजार 396, नारणे सुनंदाई बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांची 3 लाख 42 हजार 20 रुपये, टाकरखेडा येथील व्ही. के. इंटरप्रायजेस यांची 1 लाख 22 हजार 422 रुपये तर

वैजनाथ येथील श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्चर 1 लाख 18 हजार रुपये इतकी बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून खुलासे अमान्य

जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणीबाबत अहवाल मागवला होता. तसेच सोबतच करारनाम्यातील अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. याबाबत लिलावधारकांनी खुलासे सादर केले होते.

ते खुलासाने प्रशासनाकडून अमान्य करण्यात आले होते. एकूण 15 लाख 46 हजार 504 रुपयांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. यामुळे वाळू व्यवसायीकांमध्ये खळबळ माजली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या