Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo : सुपर मार्केटमध्येच काय पेपर, दुधवाले व भाजीबाजारातही वाईन द्या!

Video : सुपर मार्केटमध्येच काय पेपर, दुधवाले व भाजीबाजारातही वाईन द्या!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सुपरमार्केटमध्येच काय आता भाजीमार्केट (Vegetable market), दुधवाले (milk man) आणि पेपरवाल्यांनाही (paper boys) वाईन पोहोचविण्याचे परवाने द्या. तसेच शाळेत मुलांना खिचडीऐवजी मद्य द्या कारण उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे ती पिढी तुमचा चांगला आदर्श घेणार आहे. अशी उपरोधित टीका हभप बंडातात्या कराडकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सरकारवर केली.

- Advertisement -

ज्येष्ठ कीर्तनकार (Senior Kirtankar) असलेल्या हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya karadkar) हे सरकारवर संतापले आहेत. ते समाज प्रबोधनदेखील करतात. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यापूर्वी त्यांनी गोहत्या बंदी कायद्यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला होता.

तसेच गो हत्या बंदी कायदा महराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. यावेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Cm Pruthwiraj Chavan) हे होते.

१९९६ मध्ये त्यांनी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांची ही संस्था काम करते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीचे काम करत असताना सरकारने मात्र वाईन सुपरमार्केटमधून देण्यास सुरुवात केल्यामुळे बंडातात्या सरकारवर कडाडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या