Thursday, April 25, 2024
Homeजळगावजि.प.ची ‘बाळासाहेब ठाकरे’ आरोग्यरत्न पुरस्कार योजना

जि.प.ची ‘बाळासाहेब ठाकरे’ आरोग्यरत्न पुरस्कार योजना

जळगाव  – 

जिल्ह्यात आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करण्याच्या उद्देशाने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या विविध घटकांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून ‘बाळासाहेब ठाकरे आरेाग्यरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे.

- Advertisement -

यामध्ये रोख 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह देणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणार्‍या डॉक्टर्स् आणि कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचा या पुरस्कारात समावेश राहणार आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांना एक  पुरस्कार तर आरोग्य क्षेत्रात काम करणारे तीन डॉक्टरांपैकी एक खासगी डॉक्टर, एक वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर व एक विशेष तज्ज्ञ रुग्णालय स्तर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार एक पुरस्कार, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कर्मचार्‍यांसाठी 5 पुरस्कार असे एकूण दहा व्यक्तींना या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

याकरीता राज्यस्तरावर निवड समिती गठीत केली आहे. या निवड समितीचे निकषही लावण्यात आलेले आहेत. ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार योजना’ 23 जानेवारी 2020 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भाचे आरोग्य उपसंचालक सेवा नशिक, मंडळ यांच्याकडून दि. 12 डिसेंबर रोजी पत्र संबंधीत कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यामधून इच्छुकांनी 26 डिसेंबरपर्यंत नामांकन पत्र जिल्हा शल्य चिकिस्तक, जळगाव यांच्याकडे दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावा.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडील शासन निर्णय पत्रानुसार 17 ऑक्टोंबर 2019 अथवा जिल्हा आरोग्य अधिकरी कक्ष, प्रसिध्दी कक्ष तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या