Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबागलाण : वटार परिसरात बिबट्या जेरबंद

बागलाण : वटार परिसरात बिबट्या जेरबंद

सटाणा | प्रतिनिधी Satana

बागलाण तालुक्यातील वटार परिसरात गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांची धडकी भरुन देणारा बिबट्या बुधवारी सकाळी जेरबंद झाला आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास साेडला आहे.

- Advertisement -

जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा असून पूर्णवाढ झालेला आहे. त्याला ताब्यात घेऊन वनाधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांनी आराेग्य तपासणी केली. त्यात ताे सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वटार परिसरातील सावतावाडी व आजूबाजूच्या शेती, मळे भागात गेल्या एक महिन्यापासून हा बिबट्या धुमाकूळ घालत हाेता. दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांना लक्ष करत हाेता. येथील लक्ष्मीकांत खैरनार यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला असता बुधवारी बिबट्या सावजाच्या शोधात बकरीवर हल्ला करण्याच्या नादात जेरबंद झाला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या भागात बिबटे दहशत माजवत होते. तसेच दिवसाही शेतकऱ्यांना व मजूरांना दर्शन देत होते.

अखेर यातील एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे. परिसरात आणखी बिबटे असून ते देखील दहशत माजवत आहेत. कोणत्या ना कोणत्या वन्यप्राण्याची किंवा पाळीव प्राण्याची शिकार करून भूक भागवत आहेत. शेतकऱ्यांनी आपली पाळीव व दुभती जनावरे सांभाळावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या