Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याBacchu Kadu : सचिन तेंडुलकरांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांसह आंदोलन; पोलिसांनी घेतले...

Bacchu Kadu : सचिन तेंडुलकरांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांसह आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | Mumbai

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar’) यांच्या ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) जाहिरातीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज गुरूवार (दि. ३१ ऑगस्ट) रोजी कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील घरासमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन केले…

- Advertisement -

रक्षाबंधनासाठी जाताना कारचं टायर फुटलं, गाडी धरणात कोसळली; मुलीचा बुडून मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, “सचिन तेंडुलकरांनी ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) जाहीरातींमधून माघार घेतली नाही तर त्यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी केला होता. त्यानुसार आज प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेंडुलकर यांच्या घराबाहेर जमले होते. मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही सचिन तेंडूलकर यांचा फोटो असलेले पोस्टर कुठे आहे की नाही हे तपासले पाहिजे. ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बाहेर पडले पाहिजे. ही आमची विनंती आहे. तसे नाही झाले तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल,” असा इशारा यापूर्वीच बच्चू कडू यांनी दिला होता.

दुष्काळाची छाया गडद

दरम्यान, यावेळी आमदार कडू म्हणाले की, “सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन केले जाणार आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशाचा ते अभिमान आहेत. म्हणून त्यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी. सचिन हे भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलनही केले नसते, माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती. पण त्यांनी माघार न घेतल्याने त्यांच्या घरासमोरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या