‘कारवान व्हॅन’द्वारे नाशकात कोरोनाबाबत जनजागृती

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

सेव्ह द चिल्ड्रन-बाल रक्षा भारत (Save the Children India-Bal Raksha Bharat) या संस्थेने कोरोनाचे (Covid-19)संक्रमण रोखण्यासाठी लहान मुले व मातांसोबत हँडवॉश प्रकल्प (Handwash project) राबविला आहे. ज्यात साबणाने हात धुण्याचे फायदे, कोरोना व इतर संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी साबणाने हात धुण्याचे महत्व सांगितले जात आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे ‘कारवान व्हॅन’ (Caravan van) हा कोरोना जनजागृतीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे..

मनपा आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्त जाधव यांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या व या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे (Dr. Bapusaheb Nagargoje), कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड (Dr. Avesh Palod), सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे (Dr. Ajita Salunkhe), डॉ.प्रशांत शेटे (Dr. Prashant Shete), आपत्ती विभागाचे मंदार वैद्य (Mandar Vaidya), सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रनोती सावकार (Dr. Pronoti Savkar), प्रकल्प समन्वयक ॲड. गणेश ताठे (Dr. Ganesh Tathe), सोपान दाबेराव (Sopan Daberao), कार्यालयीन समन्वयक निखिता जंगम (Nikhita Jangam), क्लस्टर समन्वयक हर्षद गवळी (Harshad Gawli), धनश्री पाडवी (Dhanashree Padvi), किरण जानेकर (Kiran Janekar), योगेश डोलनार (Yogesh Dolnar) व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमास सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेच्या वरिष्ठ व्यवस्थापक इप्सिता दास (Ipsita Das), सहाय्यक व्यवस्थापक निरज जुनेजा (Niraj Juneja), अपर्णा जोशी (Aparna Joshi), शिरीन मॅथ्यू (Shirin Mathew), अमिताव बारीक (Amitav Barik) व हरिश वैद्य (Harish Vaidya) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपक्रम नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) भागातील जवळपास ३० आरोग्य केंद्राच्या वॉर्डमध्ये, सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) राबविला जाणार आहे. याचा मुख्य उद्देश लोकांना लसीकरण, मास्क वापरणे, हात धुणे, अंतर ठेऊन बोलणे व कोरोनाच्या संक्रमणाला आळा बसवणे हा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *