Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याबाल शौर्यवीरांचा पुरस्काराने सन्मान

बाल शौर्यवीरांचा पुरस्काराने सन्मान

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

येथील उडाण फाऊंडेशनच्या Udan foundation वतीने देण्यात येणारे 2021 चे राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार Child heroism Award जाहीर झाले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या बालशौर्य पुरस्कारासाठी नांदेडची लक्ष्मी येडेलवार, बीडचा रोहन बहिर तर भोसरी पुणे येथील आयुष तापकीर या बालकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भरत शिंदे यांनी दिली.

विद्युत प्रवाह असणार्‍या तारेला भावाचा स्पर्श झाल्यानंतर त्याला प्रथम काठीने सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुटेना म्हणून स्वतः हात पकडून जीवाची पर्वा न करता लक्ष्मीने भावाचा प्राण वाचवला तर नदीवर गाडी धूत असताना शेजारी धुणे धुणार्‍या महिलेचा नदीत तोल जाऊन ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागल्याने रोहणने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन त्या महिलेला वाचविले.

तिसर्‍या घटनेत तळ्याजवळ म्हशी चारत असताना तळ्यात आंघोळ करणारी दोन मुले पाण्यात बुडताना दिसल्यानंतर आयुष्यने क्षणाचाही विलंब न करता तळ्यात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचविले. दरवर्षी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालशौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मात्र, यंदा कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या