Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला दिले ५१ हजार

वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला दिले ५१ हजार

नाशिक । Nashik

वाढदिवसासाठी येणारा खर्च टाळून पिंपळगाव बसवंत येथील भिमाशंकर पब्लिक स्कूल येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला 51 हजारांची देणगी देण्याचे औदार्य मांजरगाव येथील सरपंच पंडीतराव सोनवणे यांचे सुपूत्र आणि मांजरगाव सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर सोनवणे यांचे पुतणे ज्ञानेश्‍वर सोनवणे या युवकाने दाखविले.

- Advertisement -

आजोबा आनंदा महादू सोनवणे यांच्या स्मरणार्थ देणगीचा धनादेश त्यांनी आ.दिलीप बनकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी दिलीप बनकर यांनी ज्ञानेश्‍वर सोनवणे या युवकाचे कौतुक करीत वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

इतर युवकांनीही ज्ञानेश्‍वर सोनवणे या युवकाचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत आ. बनकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगळे, सागर सोनवणे, सागर चव्हाण, विष्णूपंत शिंदे, योगेश सानप, प्रेम चव्हाण आदी उपस्थित होते.

दरवर्षी करतो मदत

ज्ञानेश्‍वर सोनवणे हे दरवर्षी आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता त्यावर होणार्‍या खर्चाच्या पैशांतून सामाजिक बांधीलकी जपत विविध ठिकाणी मदतीचा हात देत असतात. अनाथालय, वृध्दाश्रम आदी ठिकाणी ते मदतीचा हात देत असतात.

यावर्षी कोरोनाची परिस्थिती भयाण आहे. अनेकांना बेड मिळणे दुरापास्त झालेले आहे. त्यामुळे पिंपळगाव येेथे उभारलेल्या कोविड सेंटरला मदत करण्याचे त्यांनी ठरविले. आपली मदत कोरोनाग्रस्तांसाठी उपयुक्त ठरु शकेल, या उदार भावनेने त्यांनी 51 हजार रुपये या सेंटरला मदत म्हणून दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या