Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआरोग्य विद्यापीठाकडून डाॅक्टर, नर्सेस रुग्ण सेवेकरीता उपलब्ध

आरोग्य विद्यापीठाकडून डाॅक्टर, नर्सेस रुग्ण सेवेकरीता उपलब्ध

नाशिक | Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ४ हजार ९२३ डाॅक्टर व ६८८ नर्सेस रुग्ण सेवेकरीता उपलब्ध झाले आहेत.

- Advertisement -

विद्यापीठाचा हिवाळी सत्र – २०२० मधील वैद्यकीय व बी.एस्सी नर्सिंग अंतीम वर्ष पदवी अभ्यासकमाचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. वैद्यकीय विद्याशाखेच्या अंतीम वर्षात ९४.०६ टक्के विद्यार्थी तसेच बेसिक बी.एस्सी नर्सिग अभ्यासक्रमाचे ७६.५९ टक्के तर पोस्ट बी.एस्सी. अभ्यासक्रमाचे 56.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे मा. कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर परीक्षासंदर्भात काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.

जेणेकरुन कोविड-19 करीता प्रशिक्षित मनुष्यबळ लवकर उपलब्ध होईल. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मा. सचिव श्री. सौरभ विजय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या निर्देशानुसार या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष कोविड प्रशिक्षण देखील घेण्यात आले आहे. कोविड-19 संदर्भात आरोग्य

सेवा देण्यासाठी नवीन डाॅक्टरांची व नर्सेस यांची आरोग्य यंत्रणेला मदत होईल. वैद्यकीय विद्या शाखेच्या अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्याना आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चार दिवसाचे कोविड-१९ संदर्भात विषेष ऑनलाईन प्रशीक्षण देण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांच्यासह मान्यवर डॉक्टरांनी प्रशीक्षणात कोविड संबंधिची सद्य स्थिती, कोविड प्रतिबंधाकरीता लसिकरण, स्वतःची काळजी, आऊटब्रेक मॅनेजमेंट, कोविड- 19 मायक्रोबायोलाॅजीकल डायग्नोसिस, क्लिनिकल सिड्रोंम, ऑक्सिजन मॅंनेजमेंट, इंटेंसिव्ह केअर

मॅनेजमेंट, पॅन्डेमिक मॅनेजमेंट क्राइसिस, सोशल अवेअरनेस फोर मेडिकल स्टुडन्ट आदी विषयांवर मार्गदर्शन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या