Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकअर्थव्यवस्थेला गती देण्यात वाहन व आरोग्य उद्योग अग्रेसर

अर्थव्यवस्थेला गती देण्यात वाहन व आरोग्य उद्योग अग्रेसर

सातपूर |Satpur प्रतिनिधी

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उद्योग-व्यापार क्षेत्रांनी आघाडी घेतली असल्याचे जीएसटी कराच्या भरण्याच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यात प्रमुख्याने वाहन व हेल्थ उद्योग अग्रस्थानी आहेत त्यापाठोपाठ सेवा व टेलिकॉम उद्योग आहेत. त्याच वेळी हॉटेल व बांधकाम व्यवसाय गती घेऊ न शकल्याने त्याचा मोठा परिणाम महसूलावर पडत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

करोना आजारामुळे संपूर्ण जग लॉक डाऊन झाले होते. त्यामुळे उद्योग क्षेत्र ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडू लागली होती परिणामी शासनाने आणि अनलॉक डाऊन सुरू करण्याचा प्रयत्न चालवला असून या माध्यमातून उद्योग-व्यापार क्षेत्राला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्यक्षात गती मिळालेल्या उद्योगांमध्ये वाहन उद्योग वेग घेत आहे.

जीएसटी कार्यालयात या उद्योगांनी मोठ्या प्रमाणात जीएसटी भरले आहे. आरटीओच्या कार्यालयातही वाहनांची नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. प्रत्यक्षात महागड्या वाहनांना कमी मागणी असून त्यातही मध्यम व कमी किमतीच्या वाहनांना विशेष मागणी नोंदवली असल्याचे दिसून येत आहे.

जनतेने सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांचा तसेच परिवारासोबत छोट्या गाड्यांवर फिरण्यास टाळण्या सोबतच शासकीय यंत्रणांचा वापर टाळण्यात सुरुवात केल्यामुळे मध्यम व कमी किमतीच्या गाड्यांना विशेष मागणी वाढू लागली आहे. वाहन उद्योगा सोबतच सेवा (सर्व्हिस उद्योग) व टेलिकॉम उद्योगाला चालना मिळाली आहे.

शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देणाऱ्या मद्य विक्रीला परवानगी दिली असली तरी फारशी गती मिळू शकली नाही परमिट रूम व बार सुरू होत नसल्याने मद्यामुळे महसूलात फारशी वाढ झालेली नसल्याचे दिसून येत नाही. बांधकाम उद्योग व त्या पाठोपाठ हॉटेल उद्योग मात्र पूर्णत: ठप्प झाल्याचे चित्र आहे. वंदे भारत उपक्रमातूनही हॉटेल उद्योगाला गती देण्यासाठी प्रयत्न केला गोले.

मात्र पर्यटकांच्या अभावीहॉटेल उद्योग ठप्पच दिसून येत आहे. त्याच वेळी ज्वेलरी उद्योगांच्या अडचणी वाढलेल्या आहेत सोन्याचे भाव चढू लागले असल्याने बाजारपेठेतील मागणी घटल्याचे चित्र आहे.

मात्र बँकांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूकीकडे कल वाढल्याचे बाजारात काही अंशाने गती दिसून येत आहे. जीएसटी च्या माध्यमातून सोन्याचे दर जास्त असल्याने कमी ग्राहकांमध्ये ही रक्कम मोठी होत असल्याने करप्रणाली भरून निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या