Friday, April 26, 2024
Homeक्रीडाICC T20 World Cup : सुपर १२ चा महासंग्राम आजपासून; ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत...

ICC T20 World Cup : सुपर १२ चा महासंग्राम आजपासून; ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत पहिली लढत

अबू धाबी | Abu Dhabi

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेच्या सुपर १२ लढतींच्या महासंग्रामाला आज शनिवारपासून अबूधाबीच्या शेख झायद मैदानावर सुरुवात होणार आहे…

- Advertisement -

आजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) आव्हान असणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर दुपारी ३:३० वाजता करण्यात येणार आहे.

आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात ऑस्ट्रेलिया संघाला अपयश आले आहे. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून विजयी सुरूवात करण्यासाठी कांगारू सज्ज झाले आहेत.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ऑस्ट्रेलिया संघाला बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि विंडीज संघांविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

दोन्ही संघाची तुलना केल्यास ऑस्ट्रेलिया संघाची अडचण अधिक असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा धडाकेबाज आणि डावखुरा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर सध्या खराब लयीत आहे. नुकत्याच पार पडून गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये त्याला दोन सामन्यांमध्ये २ आणि ० आशा धावा करता आल्या होत्या.

त्यानंतर सनराईझर्स हैद्राबाद संघाने त्याला उर्वरीत सामन्यांमधून वगळले होते. तसेच भारताविरुद्ध झालेला दुसऱ्या सराव सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. आजच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मोठी खेळी करून वॉर्नर आपल्या लयीत परतणार का? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

कर्णधार एरन फिंच गुडघाच्या सर्जरीनंतर संघात परतला आहे. भारताविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नव्हती. स्टीव्ह स्मीथ आणि ग्लेन मॅक्वेलने सराव सामन्यात केलेल्या शानदार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाला १५० चा टप्पा ओलांडून दिला होता. त्यांना आपली लय अशीच कायम राखण्याची सुवर्णसंधी आहे.

ऑस्ट्रेलिया संघासाठी जमेची बाजू म्हणजे संघाकडे धारदार गोलंदाजी आहे. संघाच्या फिरकीची मदार एस्टर्न एगर आणि एडम झाम्पा यांच्यावर अवलंबून आहे. तर तेज गोलंदाजीत पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचडसन आणि मिचेल स्टार्क आहेत.

दक्षिण आफ्रिका संघाबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिका संघालाही विंडीज, श्रीलंका आणि आयर्लंड संघांकडून द्विपक्षीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत.

त्यामुळे विजयी लयीने मैदानात उतरण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज आहे. संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर क्विंटन डिकॉक एडन मार्क्रम चांगल्या फॉर्मात नाहीत. त्यामुळे इतर फलंदाजांवरील दडपण वाढत आहे.

दुसऱ्या सराव सामन्यात कर्णधार टेम्बावा बाऊमा आणि रुसी वेन्डरडूसेन यांनी पाकिस्तानविरुद्ध निर्णायक भागीदारी रचून संघाला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजीत एंड्रिक नोकिया कांगिसो रबाडा, तेवरेज शम्सी आणि केशव महाराज असे पर्याय संघात उपलब्ध आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या