Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसकारात्मक... औरंगाबादेत दुसरी लाट ओसरली!

सकारात्मक… औरंगाबादेत दुसरी लाट ओसरली!

औरंगाबाद – Aurangabad

मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट औरंगाबाद शहरात ओसरत असल्याचे चित्र आहे. परिणामी, महापालिकेने सुरु केलेल्या 21 कोविड केअर सेंटरपैकी बारा कोविड केअर सेंटरमध्ये सध्या रुग्णच नसल्याने ते सध्या बंद अवस्थेत आहेत.

- Advertisement -

एका कोविड केअर सेंटरमध्ये तर केवळ एकच रुग्ण दाखल आहे. पालिकेच्या सर्व कोविड सेंटर्सची एकूण 3,938 रुग्णांची क्षमता आहे, त्यात सध्या आठशे रुग्ण दाखल असल्याचे पालिकेने कळवले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात भयावह स्थिती निर्माण झाली होती. बाधितांची संख्या सारखी वाढत असल्याने बेड्सची मोठी समस्या निर्माण झाली होती. एका दिवशी तर 1900 पेक्षा जास्त रुग्ण औरंगाबाद शहरात आढळून आल्याने चिंता वाढली होती. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरु केल्या. राजय शासनानेही ब्रेक द चेन अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीचा देखील कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग झाला. त्याचा परिणाम म्हणून शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. मंगळवारी 174 रुग्ण पालिका क्षेत्रात आढळून आले. पालिकेने सुरु केलेल्या 21 कोविड केअर सेंटर्सपैकी आता 12 सेंटरमध्ये रुग्ण नाहीत. तर एमआयटी कॉलेजच्या बॉईज होस्टेलमधील एका कोविड केअर सेंटरमध्ये फक्त एक रुग्ण दाखल असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

बंद अवस्थेत असलेल्या बारा सेंटरमध्ये यशवंत होस्टेल विद्यापीठ परिसर, छत्रपती होस्टेल विद्यापीठ परिसर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी मुलांचे होस्टेल, देवगिरी मुलींचे होस्टेल, विभागीय क्रीडा संकुल, शासकीय बी.एड. कॉलेज मुलांचे होस्टेल, शासकीय बी.एड. कॉलेज मुलींचे होस्टेल, शासकीय विज्ञान संस्थेचे होस्टेल, संत तुकाराम होस्टेल, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज या कोविड केअर सेंटरचा समावेश आहे.

मेल्ट्रॉनसह नऊ ठिकाणी रुग्ण दाखल

मेल्ट्रॉन कोविड रुग्णालय 268

सीएसएमएसएस, कांचनवाडी 56

शासकीय अभियांत्रिकी कॉलेज 41

सिपेट कोविड सेंटर 160

रमाई होस्टेल, विद्यापीठ 18

एमआयटी बॉईज होस्टेल 1

एमआयटी बॉईज होस्टेल 170

समाजकल्याण होस्टेल, किलेअर्क 43

ईओसी, पदमपुरा 23

- Advertisment -

ताज्या बातम्या