औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने जिंकला ‘पुरुषोत्तम’ करंडक

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव । प्रतिनिधी

औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची एकांकिका मॅट्रिक प्रथम (लेखक -प्रवीण पाटेकर, दिग्दर्शक – भावना काळे आणि मुंजा माने) , द्वितीय एमजीएम संचालित कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (एकांकिका- रंगबावरी, लेखक- संदीप दंडवते, दिग्दर्शक- वैष्णवी सोनार) तर तृतीय मू.जे.महाविद्यालय (एकांकिका- इदी, लेखक- समीर पेणकर, दिग्दर्शक सिद्धार्थ सोनवणे, प्रज्ञा बिर्‍हाडे) यांनी पुरस्कार मिळवला.

सर्वोत्कृष्ट अभिनय आणि प्रशस्तीपत्र भूमिका आबा -आकाश ताठे (एकांकिका मॅट्रिक महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद )सर्वोत्कृष्ट लेखक  आणि प्रशस्तीपत्र -लीना नारखेडे (एकांकिका 72 चे गणित महाविद्यालय कला विज्ञान आणि पी.ओ. नहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – फिरता करंडक आणि प्रशस्तीपत्र- भावना काळे आणि मुंजाभाई माने (एकांकिका मॅट्रिक महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद) सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय- अवरोध -वेदांनी जोशी (एकांकिका 72 चे गणित कला विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ) अभिनय स्त्री भूमिका चीमी -साक्षी वाणी (एकांकिका रंगबावरी एस. एम. कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय चोपडा) अभिनय पुरुष – भूमिका तात्या – श्रीकांत मंडलिक (एकांकिका मॅट्रिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद).

मूळ प्रश्न मांडा-परीक्षक प्रदीप वैद्य यांनी सांगितले की, नाटक करताना  कलाकारांनी पाय रोवून थांबले पाहिजे. जगण्याचे प्रश्न मांडताना इथले मूळ प्रश्न  त्यात दिसले  पाहिजे.  त्यासोबतच कुठेतरी कॉपी-पेस्ट दिसल्या, असे मत मांडले. प्राजक्त देशमुख यांनी रंगभूमीच्या शक्तीपेक्षा सिनेमॅटिक परफॉर्मन्स सादर जास्त झाले.नाटकाची  शक्यता नाटकातच शोधत राहणे महत्वाचे  आहे, असे सांगितले. नितीन धनधुके यांनी म्हणाले की, तुम्ही जसे आहात, तसेच दाखवा, म्हणजे हे नाटक सादर करताना त्याचा आनंद तुम्हाला मिळेल.

बक्षीस वितरण-पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी व्यासपीठावर केसीई सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा.चारुदत्त गोखले ,केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मू.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, महाराष्ट्रीय कलोपासक पुण्याचे राजेंद्र नागरे, परीक्षक म्हणून नाशिकचे प्राजक्त देशमुख, पुण्याचे प्रदीप वैद्य, नितीन धनधुके उपस्थित होते. सूत्रसंचालन  डॉ.योगेश महाले यांनी केले.पुरस्कार वाचन प्रसाद देसाई यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *