Saturday, April 27, 2024
Homeनाशिकगहू, तांदूळ उचलण्यासाठी 7 ऑगस्टची मुदत

गहू, तांदूळ उचलण्यासाठी 7 ऑगस्टची मुदत

नाशिक । Nashik प्रतिनिधी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यासाठी या योजनेनुसार अन्नधान्य वाटपासाठी 1800 मेट्रिक टन गहू व तांदळाची गरज आहे. जुलै महिन्याचा स्टॉक उचलण्याचे काम रेशन दुकानदारांकडून सुरु आहे. स्टॉक मोठा असल्याने या योजनेतील गहू व तांदुळ उचलण्यासाठी दुकानदारांना येत्या 7 ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे 35 लाख लाभार्थी आहेत. करोना संकटात लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी या योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत दिले जात होते. त्यात जुलै महिन्यापासून प्रति लाभार्थी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे.

15 जुलैपर्यंत राज्यात एकूण 18 लाख 99 हजार 330 रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. या रेशनकार्ड वरील 81 लाख 97 हजार लोकसंख्येला 4 लाख 9 हजार 891 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात या योजनेचे 35 लाखांहून अधिक लाभार्थी आहे. त्यांना 2700 रेशन दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप सुरु आहे. त्यासाठी महिन्याला 1800 टन अन्नधान्याची गरज आहे.

त्यात गहू 1100 क्विंटल तर 700 क्विंटल तांदळाच्या स्टॉकची गरज आहे. ऐवढ्या मोठया प्रमाणात अन्नधान्य उचलण्यासाठी रेशन दुकानदारांची दमछाक होत आहे.जुलै महिन्याच्या एकूण स्टॉकपैकी 60 टक्के अन्नधान्य उचलून त्याचे रेशन दुकानदारांनी वाटप केले आहे. तर उर्वरीत स्टॉक उचलण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने येत्या 7 ऑगस्टपर्यंतची रेशन दुकानदारांना मुदतवाढ दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जिल्ह्याला 1800 मेट्रिक टन गहू व तांदुळ प्राप्त झाले आहे. ऐवढा मोठा स्टॉक एकाचवेळी उचलणे शक्य नसल्याने रेशन दुकानदारांना 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

– डॉ.अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या