Saturday, April 27, 2024
Homeनाशिककाका-पुतण्याच्या लढतीने वेधले लक्ष

काका-पुतण्याच्या लढतीने वेधले लक्ष

वावी । संतोष भोपी Vavi

वावी ग्रामपंचायतची एक जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 10 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सत्ताधारी श्री गुरुकृपा पॅनल व विरोधी परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत होत असली तरी राजेभोसले काका-पुतण्याच्या लढतीने तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

निवडणुकीत माजी सरपंच विजय काटे, माजी सरपंच रामनाथ कर्पे, कन्हैयालाल भुतडा, दिलीप वेलजाळी, आशिष माळवे, बाळासाहेब खाटेकर व विजय सोमाणी यांच्या नेतृत्त्वाखाली श्री गुरुकृपा पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. तर सत्ताधारी पॅनलला शह देण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले, माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी, अरुण भरीतकर, ईलाहीबक्ष शेख व दीपक वेलजाळी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन व श्री समर्थ पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे.

निवडणूक सुरू होण्यापूर्वीच प्रभाग तीनमध्ये श्री गुरुकृपा पॅनलच्या मीना नवनाथ काटे बिनविरोध विजयी झाल्या. तांत्रिक कारणाने परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर गुरुकृपा पॅनलले आपले खाते उघडले. प्रभाग एक हा माजी सरपंच रामनाथ कर्पे यांचा 30 वर्षांपासून बालेकिल्ला मानला जातो. कर्पे हे सलग 25 वर्षे या प्रभागात सदस्य होते. त्यांनी सरपंचपदही भूषवले. त्यानंतर त्यांचा मुलगा प्रशांत पाच वर्षांपासून सदस्य असून ते पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. कर्पे यांचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी परिवर्तन पॅनलचे नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भरीतकर यांनी उडी घेत प्रभाग एकमध्ये चुरस निर्माण केली आहे.

दहा वर्षांपूर्वींही भरीतकर यांनी या प्रभागात नशीब आजमावले होते. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भरीतकर यांनी पुन्हा आव्हान उभे केले आहे. या प्रभागात दोन महिला राखीव जागेसाठी श्री गुरुकृपा पॅनलकडून प्रेमलता कैलास जाजू, मीना प्रदीप मंडलिक यांचा सामना परिवर्तन पॅनलच्या शीतल किशोर आनप व सारिका विश्वनाथ लांडगे यांच्यासोबत होत आहे. प्रभाग दोन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यावेळी प्रभागत दोनमध्ये सर्वसाधारण जागेवर माजी सरपंच विजय काटे यांनी प्रतिष्ठित व्यावसायिक व शालेय समिती अध्यक्ष कन्हैयालाल भुतडा यांना बरोबर घेऊन उमेदवारी केली आहे.

गुरुकृपा पॅनलचे नेते विजय काटे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात अनेकांना धक्का बसला. महिला राखीव जागेवर त्यांनी दीपाली ज्ञानेश्वर खाटेकर यांना सोबत घेतले आहे. तर माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी यांनीही त्यांचे पुत्र गणेश वेलजाळी यांना परिवर्तन पॅनलकडून उमेदवारी दिल्याने रंगत वाढली आहे. या प्रभाागत सर्वसाधारण दोन जागेसाठी केवळ तीन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग दोनमधील सदस्य असलेले ज्येष्ठ सदस्य ईलाहीबक्ष शेख यांनी अचानक माघार घेतली आहे. या प्रभागात महिला राखीव जागेसाठी परिवर्तन पॅनलच्या वैशाली वाल्हेकर यांचा सामना गुरुकृपा पॅनलच्या दीपाली खाटेकर यांच्यासोबत होत आहे.

प्रभाग तीनमध्ये एका जागेसाठी श्री गुरुकृपा पॅनलचे गणेश वेलजाळी व परिवर्तन पॅनलचे रामराव ताजणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या प्रभागात महिला राखीव जागेवर श्री गुरुकृपा पॅनलच्या मीना काटे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग चार हा माजी सरपंच व सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या निवडणुकीत राजेभोसले यांनी श्री समर्थ पॅनलकडून शंकर राजेभोसले यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या