डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा

सार्वमत

नवी दिल्ली – डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांवर हल्ला करणार्‍यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये केलेल्या तरतुदीनुसार हल्लेखोरांवर दोन लाखांपर्यंतचा दंडही आकारण्यात येणार आहे. तसेच या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे असेही ते म्हणाले.

सध्या कोरोनाच्या लढाईमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे प्राणांची बाजी लावून लढत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार देशात घडले हे दुर्दैवी आहे. यापुढे हे मुळीच सहन केले जाणार नाही. याचसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे.

महामारी रोग अधिनियम, 1897 मध्ये (एळिवशाळल ऊळीशरीशी रलीं, 1897) सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. तसेच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येणार आहे,फ असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *