Wednesday, April 24, 2024
Homeनगरम्हसणे, सुलतानपूरमध्ये तिघांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल

म्हसणे, सुलतानपूरमध्ये तिघांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

म्हसणे,सुलतानपुर येथे मागील घटनेवरून झालेल्या भांडणात एकास जातीवाचक शिवीगाळ केल्याने तिघांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जितेंद्र वाबळे, किसन वाबळे व आशा वाबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रमेश गायकवाड यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्याद दिली आहे. यात गायकवाड हे गुरुवारी (दि.15) रात्री दहाच्या सुमारास म्हसणे सुलतानपुर ग्रामपंचायतीसमोर मित्र सुरेश रणशूर यांच्या सोबत गप्पा मारत बसले होते. यावेळी गावातील जितेंद्र वाबळे हा तेथे आला व त्यांना जातीवाचक शिवगाळ करू लागला.

गायकवाड यांनी जातीवरून शिव्या न देण्याबाबत समज दिली. असे असताना त्यांनी गायकवाड यास लोखंडी रॉड व पीबीसी पाईपने मारहाण केली. यावरून गायकवाड यांचे आईवडील चुलत भाऊ असे किसन रामभाऊ वाबळे व आशा वाबळे यांना तुमच्या मुलाने मारहाण का केली असे विचारण्यास गेले असता त्यांना पण जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली.

पोलिसांनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे करत असून त्यांना सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे साह्य करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या