Thursday, April 25, 2024
Homeनगरगॅस कटरने एटीएम फोडले

गॅस कटरने एटीएम फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. यामुळे एटीएम सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवार पहाटे अहमदनगर- पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) गावच्या शिवारात टाटा इन्डीकॅश कंपनीचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडले. या एटीएममधून तीन लाख सहा हजार 900 रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाटा इन्डीकॅश एटीएमचे अधिकारी विजय केशव थेटे (रा. कोल्हार बु. ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. एटीएम फोडताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. गॅस कटर टोळीने हे एटीएम फोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान जिल्ह्यात एटीएम फोडीच्या वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या पोलिसांनाही या टोळ्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या