Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशिक्षकाचा अफलातून प्रयोग : आश्रमशाळा आपल्या दारी

शिक्षकाचा अफलातून प्रयोग : आश्रमशाळा आपल्या दारी

नाशिक । प्रतिनिधी

श्री.शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित ,स्व.गंगाधर (आण्णासाहेब) शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नायडोंगरी ता.नांदगांव जि.नाशिक या संस्थेतील शिक्षक घरोघरी जाऊन शिक्षण देत आहेत.

- Advertisement -

करोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू या शासनाच्या धोरणानुसार मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत.

आजपर्यंत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गाचा व्हाॅट्स अॅपचा ग्रुप तयार करुन दररोजचा अभ्यास टाकतात परंतू सर्व पालकांकडे एंड्रॉइड मोबाईल नसल्या कारणाने आश्रमशाळा आपल्या दारी या उपक्रमाचे नियोजनाचे केले आहे.

त्यांना मोलाचे मार्गदर्शन संस्थेचे सरचिटणीस, माजी आमदार अनिलकुमार आहेर यांनी केले . शाळेतील विद्यार्थी असलेल्या पिंपरखेड, पिंप्री ता.नांदगाव व हातगाव, तळेगाव ,तळोंदे ता.चाळीसगाव येथील आदिवासी वस्तीत जाऊन विद्यार्थ्याना शिक्षकवृंद अध्यापन करताना दिसत आहेत. सर्वांना पालक व विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

जोपर्यंत शाळेत विद्यार्थी येणार नाहीत तोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देणार असा आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांनी निश्चय केला आहे. या निर्णयाचे व उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या