Friday, April 26, 2024
Homeनगरअशोक कारखाना निवडणूक : लोकसेवा विकास आघाडीचे उमेदवार जाहीर

अशोक कारखाना निवडणूक : लोकसेवा विकास आघाडीचे उमेदवार जाहीर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील 21 जागांपैकी लोकसेवा विकास आघाडीच्या 18 उमेदवारांची नावे लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांचे अध्यक्षतेखालील उमेदवार निवड मंडळाने जाहीर केली. उर्वरित तीन उमेदवारांची नावे आज जाहीर केली जाणार आहेत. तसेच विरोधी गट शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची यादी आज 12 वाजेपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे यांनी दिली.

- Advertisement -

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी येत्या 16 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या 18 उमेदवारांची यादी काल सोमवार दि.3 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यात सर्वसाधारण गट क्र.1 पढेगाव : बनकर यशवंत गोविंद (पढेगाव), धुमाळ हिम्मतराव माधवराव (वळदगाव), थोरात रावसाहेब हरी (उक्कलगाव), सर्वसाधारण गट क्र.2 कारेगाव : उंडे भाऊसाहेब धोंडीराम (कारेगाव), सर्वसाधारण गट क्र.3 टाकळीभान : मुरकुटे भानुदास काशिनाथ (कमालपूर), पटारे ज्ञानदेव सोपान (घोगरगाव), शिंदे पुंजाहरी तुकाराम (भोकर), सर्वसाधारण गट क्र.4 वडाळामहादेव : कसार रामभाऊ तुळशीराम (वडाळामहादेव), उंडे कोंडीराम बाबाजी (मातापूर), काळे ज्ञानेश्वर बाबासाहेब (खोकर), सर्वसाधारण गट क्र.5 उंदिरगाव : गलांडे विरेश भाऊसाहेब (उंदिरगाव), झुराळे आदिनाथ निवृत्ती (निमगावखैरी), आदिक बाबासाहेब कडू (खानापूर), ‘ब’ वर्ग सोसायटी मतदार संघ : राऊत सोपानराव पुंजाजी (निपाणीवडगाव), अनु. जाती/अनु. जमाती मतदार संघ : रणनवरे यशवंत दिनकर (टाकळीभान), महिला प्रतिनिधी : साळुंके हिराबाई ज्ञानदेव (टाकळीभान), गवारे शीतल आबासाहेब (शिरसगाव), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : कोकणे अमोल बाबासाहेब (बेलपिंपळगाव) याप्रमाणे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

याव्यतिरिक्त भेर्डापूर, पाचेगाव सर्वसाधारण तसेच भटक्या विमुक्त जाती जमातीच्या उमेदवारांची नावे आज जाहीर केली जाणार आहेत.

कारखान्यावर 35 वर्षांपासून माजी आ. मुरकुटे यांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत त्यांच्या लोकसेवा मंडळाच्या विरोधात दोन्ही शेतकरी संघटना, आदिक गट, आ. कानडे समर्थक एकत्र आले असून रात्री उशिरापर्यंत या विरोधकांकडून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरु होता. यात डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, अर्चना राजेंद्र पानसरे, शांताबाई जाधव, विलास इंद्रनाथ थोरात, प्रवीण देवकर, युवराज जगताप, अनिल औताडे, कार्लस साठे, शरद पवार, विष्णूपंत खंडागळे, यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ऐनवेळी एखादी दुसरी उमेदवारी बदलण्याची शक्यता आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागेसाठी 16 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 271 जणांनी 277 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत 49 अर्ज अवैध ठरल्याने 194 अर्ज राहिलेले आहेत. अवैध ठरविलेल्यांपैकी तीन उमेदवारांनी साखर आयुक्तांकडे अपिल केले होते. त्यांचे अपिल फेटाळण्यात आल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. सत्ताधारी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा मंडळाच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी विरोधक एकवटले असून त्याला कितपत यश येते हे आज दिसून येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या