Wednesday, April 24, 2024
Homeनगरआशा स्वयंसेविकांचे मानधन रखडले

आशा स्वयंसेविकांचे मानधन रखडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरकारी काम अन् थोडा वेळ थांब याचा अनुभव आता मानधनावर काम करणार्‍या जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना येत आहे. सिंगल नोडल अकाउंटच्या (नवीन खात्याच्या) नावाखाली गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांचे मानधन रखडलेले आहे. दोन दिवसांत अर्थात 31 जानेवारीपर्यंत मानधन न मिळाल्यास जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आंदोलन करण्याच्या तयारी आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात आरोग्य विभाागा अतंर्गत 3 हजार 316 आशा स्वयंसेविका आणि 172 गट प्रवर्तक काम करत आहेत. या स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला देण्यात येतो. दैनंदिन कामासोबतच या सेविकांनी करोनाच्या काळात मोठे योगदान दिलेले आहे. करोना काळातील विविध सर्वेक्षणासह करोना रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करणे, त्यांच्या नोंदी जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून बँक खाते बदलण्याच्या नावाखाली गेल्या चार माहिन्यांपासून काम करूनही या आशा सेविका आणि गटप्रवर्तक या मानधनापासून वंचित आहेत.

आधी मानधन देण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे कारणे देण्यात येत होती. त्यानंतर नव्याने बँक खाते उघडण्याचे काम सुरू असल्याचे आशा स्वयंसेविकांना सांगण्यात आले. एका आशा स्वयंसेविकेला महिन्याला किमान 5 हजार 500 ते कमाल 10 हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते. पूर्वी मानधनाचा निधी जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर आल्यानंतर आशा सेविकांना अदा करण्यात येत होता. मात्र, आता तांत्रिक कारणामुळे सिंगल नोडल अकांऊट सुरू करण्यात येत असून यामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचे नव्याने बँक खाते उघडण्यात येत आहे. यासाठी संबंधीतांकडून आवश्यक कागदपत्रे घेण्यात आलेली आहे. लवकरच खाते उडल्यानंतर आशा सेविकांचे मानधन अदा करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. तर 31 जानेवारीपर्यंत आशा सेविकांच्या खात्यावर मानधन अदा होईल, असे सांगण्यात येत आहे. न झाल्या पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आयटक आशा संघटनेच्या उपाध्यक्षा सुवर्णा थोरात यांनी सांगितले.

तालुकानिहाय आशा कंसात गट प्रवर्तक

अकोले 347 (25), जामखेड 143(7), कोपरगाव 201 (10), कर्जत 214 (11), नगर 251 (14), नेवासा 278 (16), पारनेर 222 (11), पाथर्डी 175 (9), राहाता 241 (12), राहुरी 200 (9), संगमनेर 319 (18), शेवगाव (10), श्रीगोंदा 236 (12), श्रीरामपूर 146 (12), श्रीरामपूर 146 (8) असे आहेत. तर कोपरगाव नगर पंचायत 26, संगमनेर 25, श्रीरामपूर 36, मनपा 48 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या