Friday, April 26, 2024
Homeनाशिकतोफखाना केंद्राचा शपथविधी; नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल

तोफखाना केंद्राचा शपथविधी; नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल

नाशिक रोड l Nashikroad (प्रतिनिधी) :

भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथून सुमारे ३०२ नवसैनिक भारतीय सैन्य दलात दाखल झाले. शनिवार (ता. १४) रोजी करोनाच्या सावटाखाली येथील उमराव मैदानावर दिमाखदार दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी ३०२ नवसैनिकांच्या तुकडीने शानदार परेड सादर करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला.

- Advertisement -

सर्व सामान्य युवकांनी ४२ आठवड्याचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करत स्वत:ला भारताचे सैनिक झाले. नवसैनिकांच्या माता-पित्यांना यावेळी ब्रिगेडियर गोराया यांच्या हस्ते गौरव पदक समारंभपूर्वक सन्मानाने प्रदान करण्यात आले. या सोहळ्यादर्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धूनने लक्ष वेधून घेतले.

कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी परेड संचलनाचे निरीक्षण करत नवसैनिकांचा गौरव केला. शपथविधीसाठी होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या “सैनिक धर्म बजावावा आणि भारताची तोफा मैदानावर आणण्यात आल्या होत्या.

नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर बनविले या नवसैनिकांती तोफखान्याचे संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवसैनिकांनी नेहमीच सेवा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून शंकाथली गोपीनाथ यांना गौरविण्यात आले. भारतीय नवसैनिकांनी नेहमीच सैनिक धर्म बजावावा अणि भारतीची सेवा करत भारतीय सेनेची उज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन ब्रिगेडियर गोराया यांनी केले. यावेळी गोराया यांनी भारतीय सैन्य दलात स्वागत करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या