नाशिक | प्रतिनिधी Nashik
डॉ. निलेश लोढा यांचे मेगा रिलीफ पेन क्लिनिकचा ११ वर्धापन दिन उद्या १५ जून रोजी साजरा होत आहे. याप्रसंगी डॉ. निलेश लोढा यांच्या मेगा रिलीफ पेन क्लिनिकमध्ये संधिवात तपासणी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी व नसांची तपासणी शिबीर उद्या दि. १५ जून रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात सांधे दुखणे, वारंवार ताप येणे, कमी वयात कंबर दुखणे, मास पेशींचे दुखणे, सकाळी उठल्यावर कंबर, सांधे तारारणे, शरीर सुजणे, तोंडाचा व डोळ्यांचा कोरडेपणा, बोटे काळी पडणे, वाढलेले युरिक अॅॅसिडचे प्रमाण, सांध्यांमध्ये करकर आवाज येणे, वारंवार फ्रॅक्चर होणे, पाठीला बाक येणे आदी दुखण्यासंबधी या शिबिरात तज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य ते निदान व उपचार केले जातील. या व्यतिरिक्त दातांशी संबंधित दुखण्यावर देखील निदान व उपचार केले जातील.
तरी सर्व संबंधित रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मेगा रिलीफ पेन क्लिनिक, सुयोजित डेटा मॅटीक्स बिल्डिंग, अपोलो क्लिनिक जवळ, मुंबई नाका येथे संपर्क करावा, असे आवाहन डॉ. निलेश लोढा, डॉ. तृप्ती लोढा यांनी केले आहे.