Tuesday, April 23, 2024
Homeधुळेलसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्यात उपायुक्त गणेश गिरी यांना अटक करा!

लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्यात उपायुक्त गणेश गिरी यांना अटक करा!

धुळे Dhule। प्रतिनिधी

कोरोना (Corona) लसीकरण (vaccination) प्रमाणपत्र घोटाळा (certificate scam) दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या उपायुक्त (Deputy Commissioner) गणेश गिरी (Ganesh Giri) यांना पोलीसांनी ताब्यात घ्यावे म्हणजे पडद्यामागचे सूत्रधार बाहेर येतील व संघटित गुन्हेगारी (मोक्का) व देशद्रोहाचे कलम लावावे अशी मागणी शिवसेनेने (Shiv Sena) केली आहे. याबाबत पोलीस अधिक्षक (Superintendent of Police) प्रविणकुमार पाटील (Pravin Kumar Patil) यांना निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्यात आरोपींना अटक झाल्याचे दिसत असले तरी एका राजकीय पुढार्‍याच्या हस्तक्षेपामुळे घोटाळा दडपण्याचाच प्रयत्न मनपा प्रशासनाने केला होता. मालेगाव मनपाच्या पत्रानंतर हालचाल सुरू झाली. आरोग्य विभागातील एका महिला अधिकार्‍याने संशयित लसीकरण केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांना कारवाईची भीती दाखवत झालेला प्रकार वदवून घेतला व त्या कर्मचार्‍यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या सांगण्यावरून कृत्य केल्याचे लेखी पत्र आयुक्तांकडे दिले. यातील गांभीर्य पाहून आयुक्तांनी तात्काळ उपायुक्त गणेश गिरी यांना सखोल चौकशीचे आदेश दिले.

परंतु एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. उपायुक्त गिरी यांनी योग्य चौकशी करून यातील आरोपींना तुरुंगात पाठविले असते तर राजकीय नेत्याच्या आदेशाने वरिष्ठांच्या आदेशाने हा प्रकार केल्याचे लेखी देणार्‍या कर्मचार्‍यांकडून आम्ही दिलेले लेखी पत्र हे भीतीपोटी दिले होते तसे काही घडले नसल्याचा व्हिडिओ चित्रीकरण करून घेतले व यात पालिकेच्या कर्मचारी व अधिकारी यांचा काही संबंध नसल्याचा देखावा तयार करून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र शहर पोलीस स्टेशनला दिले व मनपा प्रशासन गाफील राहिले. परंतु शिवसेना महानगरने आंदोलन करून हे प्रकरण उघडकीस आणले.

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे मनपा आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना तुरुंगात पाठविले. हे प्रकरण म्हणजे संघटित गुन्हेगारी व देशद्रोही कृत्य आहे. कारण ज्या आठ ते दहा हजार नागरिकांना बनावट लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. ते सर्व नागरिक जनतेते फिरून कोरोनाचा फैलाव करीत आहेत.

धुळे मनपाच्या या कृत्यामुळे कलंकित झालेे आहे. त्यामुळे हे कृत्य दडपण्याचा प्रयत्न करणारा राजकिय पुढारी कोण हे उघड झाले पाहिजे. व या प्रकरणातील सूत्रधारांना उघड करण्यासाठी उपायुक्त गिरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे त्यांच्या मोबाईल वर झालेले संभाषण मिळविले पाहिजे. उपायुक्त गिरी यांची कसून चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

निवेदनावर सहसंपर्कप्रमख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित्त, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, संघटक राजेश पटवारी,उपमहानगर प्रमुख संदीप सूर्यवंशी,संदीप चव्हाण, संजय वाल्हे, भरत मोरे, विनोद जगताप, डीगंबर चौधरी, छोटू माळी, कैलास मराठे, प्रवीण साळवे, समाधान शेलार, अजित बागुल, अश्विन बाफना, शेखर बडगुजर, निलेश मराठे, संदीप चौधरी, शुभम मतकर, परेश पाटील, सनी मोरे, सुयोग मोरे यांच्या साक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या