‘ती शिस्त, तो जोश, ती ऊर्जा’

jalgaon-digital
2 Min Read

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील कॉम्बॅट कोर्स एव्हिएशन हेलिकॉप्टर प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि बेसिक रिमोटली पायलेटड एअरक्राफ्ट सिस्टम कोर्सचा दीक्षांत समारंभ उत्साहात झाला.

कॉम्बॅट आर्मी एव्हिशन ट्रेनिंग स्कूल ही भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेच्या सर्व विद्यार्थी, अधिकार्‍यांसाठी संयुक्त पासिंग आऊट परेड आज झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना विंग देऊन तर विशेष कामगिरी करणार्‍यांना करंडक देण्यात आला. संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान अधिकार्‍यांनी विमान उड्डाणाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण 37 अधिकारी या प्रशिक्षणातून तयार झाले आहेत. 21 अधिकार्‍यांना हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित विंग्ज प्रदान करण्यात आले.

एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण केल्यानंतर आठ अधिकार्‍यांना प्रशिक्षक होण्यासाठी बॅच देण्यात आला. बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टम यशस्वी पूर्ण केल्यानंतर आठ अधिकार्‍यांना आरपीएएस पायल बनण्यासाठी आरपीएएस विंग देण्यात आली. कॅप्टन जी. वी. पी. प्रथुष यांना सिल्वर चिता करंडक, मेजर हर्षित मल्होत्रा यांना मेजर प्रदीप अग्रवाल करंडक, मेजर प्रणीत कुमार यांना ग्राऊंड विषयातील आर्डर ऑफ मेरिट करंडक देण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मेजर पल्लव वैशंपायन यांना ग्राऊंड विषयातील सर्वोत्कृष्ट आणि लेफ्टनंट कमांडर अनिल कुमार यादव यांना फ्लाईंग प्रशिक्षकसाठी फर्स्ट इन आर्डर ऑफ मेरिट करंडक देण्यात आला. आर्मी एव्हिएशनने गौरवशाली 37 वर्षे पूर्ण केली आहेत. ते निर्वादपणे एक शक्तीशाली बलगुणक आणि भारतीय सैन्याचे प्रमुख लढाऊ सक्षम आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *