Friday, April 26, 2024
Homeनगरअकरावीसाठी जादा तुकड्या मंजूर करा; पालकांची मागणी

अकरावीसाठी जादा तुकड्या मंजूर करा; पालकांची मागणी

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता दहावीच्या परीक्षांचे निकाल लागले. जवळपास शंभर टक्के निकालाची सर्व शाळांची आकडेवारी जाहीर झाल्याने अकरावी प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे.

- Advertisement -

प्राप्त परिस्थितीत असलेल्या ११ वीच्या सर्व जागा कमी पडणार असल्याने राहुरी तालुक्यातील सर्व शाळांना कॉलेजेस यांना अकरावीसाठी जास्त तुकड्या मंजूर कराव्यात, अशी मागणी शाळा व्यवस्थापनसह पालक वर्गातून होत आहे.

शहरात कै. लालाशेठ विद्यामंदीर प्रशाला, रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, भागीरथीबाई तनपुरे शाळा आदी ठिकाणी अकरावी व बारावी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जवळपास सर्व शाळांची अंतिम यादी ९० टक्केच्यापुढे गेली असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश आज उपलब्ध नाही.

तरी ज्या शाळांनी उपरोक्त विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था उपलब्ध केली असेल व मागणी केली असेल, अशा शाळांना त्वरित शासनाकडून वाढीव तुकड्यांना मंजुरी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या