Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedपेट्रोलची टाकी फुल्ल करून घ्या, अन्यथा...!

पेट्रोलची टाकी फुल्ल करून घ्या, अन्यथा…!

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद शहरातील पंपांना पेट्रोलचा (Petrol pump) कमी पुरवठा केला जात आहे. यामुळे याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. वाहनधारकांनी (Vehicle owner) आगामी परिस्थितीचा विचार करून सध्या टाकत असलेल्या पेट्रोलपेक्षा जास्त पेट्रोल गाडीत टाकून ठेवावे, असे आवाहन असोसिएशनकडून (Association) करण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील महिनाभरापासून (Petrol and diesel) पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ न केल्यामुळे ऑईल कंपन्यांना (Oil companies) तोटा सहन करावा लागत आहे. प्रतिलिटर १५ ते २० रूपयांचा तोटा होत आहे. यामुळे शहराला होणारा पेट्रोल ब डिझेलचा पुरवठा कमी केला आहे. सध्या २० ते २५ टक्के कमी पेट्रोल मिळत असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास महिन्याअखेरीस शहरात भीषण पेट्रोल टंचाई जाणवू शकते, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद शहरात मागील महिनाभरापासून पेट्रोलचा पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी मिळत आहे. औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास, हितेन पटेल, झक्झीयस प्रिंटर सह अन्य डिलर्सने या समस्येबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अखिल अब्बास यांनी महिनाभरापासून औरंगाबाद शहरातील पंपचालकांना नियमित पुरवठा केला जात नाही. मागणीनुसार ऑईल कंपन्यांकडून वितरण होत नाही. यामुळे शहरातील अनेक पंपाचा पेट्रोल साठा संपत आहे. परिणामी , पंप बंद ठेवण्याची वेळ औरंगाबाद शहरातील पंप चालकांवर आलेली आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात ५५ पेट्रोल पंप आहेत. यामधून अनेक पंप दररोज बंद राहत आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींकडून महिन्याच्या अखेरीस पेट्रोल पुरवठा कमी होण्याची शक्‍यता वर्तवलेली आहे. शहरवासीयांना पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागण्याचीही शक्‍यता पंपचालकांनी व्यक्‍त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या