Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याST Workers Strike : 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणार्‍यांना माफी

ST Workers Strike : 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणार्‍यांना माफी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आंदोलक एसटी कर्मचार्‍यांना (ST Workers) 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तोपर्यंत कामावर रुजू होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांंच्या बदल्या रद्द केल्या जात आहेत. तरीही आडमुठी भूमिका घेतल्यास मात्र एसटी महामंडळ (MSRTC) कारवाई करू शकते, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे…

- Advertisement -

न्यायालयाने (Court) आंदोलन (Agitation) करणार्‍या कर्मचार्‍यांंना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. कामगारांना कामावरून न काढण्याविषयी न्यायालयाने महामंडळाला सूचना केली.

सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन (Agitation) सुरू केले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जगण्याचे साधन हिरावून घेऊ नका, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

मात्र, तरी देखील 22 तारखेपर्यंत कामावर रुजू न झाल्यास महामंडळ कारवाईसाठी मोकळे होणार आहे. सध्या सेवा समाप्त केलेल्या कामगारांंना पुन्हा सामावून घेतले जात आहे. मात्र संप काळातील पगार मिळणार नाही.

ज्यांंच्या बदल्या झाल्या त्या रद्द केल्या जात आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांंच्या देय रकमा वेळीच दिल्या जाणार आहे. बडतर्फ कांमगारांना पुनर्स्थापीत केले जाणार आहे. त्यामुळे निम्म्याच्यावर कर्मचारी कामावर हजार झाले आहेत. अजून चार दिवसात बाकीचे येतील, अशी महामंडळाला आशा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या