Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्प निविदा प्रक्रिया सुरू

अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्प निविदा प्रक्रिया सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनास चालना मिळावी, यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्राथमिक अहवाल व सर्व प्रकारची व्यवहार्यता तसेच डीपीआरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदाप्रक्रिया सुरू केल्याने रोपवे प्रकल्प दृष्टीपथात आल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने रोपवेच्या कामाविषयीची निविदा 31 जुलैपर्यंत मागविल्या असून, त्यामुळे लवकरच रोपवे प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची खात्री खा.हेमंत गोडसे यांनी दिली आहे. भाविकांना थेट अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाणे सोपे व्हावे यासाठी अंजनेरी-ब्रह्मगिरी या धार्मिक पर्वतांना जोडणारा रोपवे उभारण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटकांनी खा.गोडसे यांच्याकडे सतत मागणी लावून धरलेली होती.

या प्रकल्पाची वस्तूस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे प्रकाश गौर, प्रशांत जैन, एन.सी. श्रीवास्तव यांनी अंजनेरी, ब्रह्मगिरी परिसराची पाहणी केली होती.यावेळी या ठिकाणी रोपवे होणे किती गरजेचे आहे हे खा.गोडसे यांनी या अधिकार्‍यांना पटवून दिले होते. प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे विषयीच्या सर्व व्यवहार्यता यशस्वीपणे तपासून घेतल्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्याकामी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करावी यासाठी खा.गोडसे यांचा केंद्राकडे सततचा पाठपुरावा सुरू होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या