Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपावसाळापूर्व आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम

पावसाळापूर्व आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात सुमारे साडेनऊ लाख जनावरे आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पावसाळापूर्व आजाराच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केले. आतापर्यंत ८७ हजाराहून अधिक जनावरांना लस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांंनी दिली.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोधन आहे. जिल्ह्यात सुमारे साडेनऊ लाख जनावरे आहेत. पावसाळ्यात घटसर्प आणि अंतर विशार हे आजार होण्याची प्रमाण मोठया संख्येने असते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी लसीकरण करण्यात येते. यासाठी राज्य शासनाकडून एक लाख लसीच्या मात्रा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ८७ हजार जनावरांना लस देण्यात आली आहे.

तसेच अंतर विशार आजाराच्या पार्श्वभूमीवर देखील प्राप्त ८० हजार पैकी ७१ हजार जनावरांना देण्यात आली आहेत. यासाठी जिल्ह्यातील २६६ पशुसंवर्धन पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम सुरू होती. १०१ पशुधन विकास अधिकारी, १५० पशुधन पर्यवेक्षक आणि तीनशे कर्मचार्‍यांनी मिळून ही मोहीम सुरू आहे. लस न दिलेल्या जनावरांना देखील आठ दिवसात लस देण्यात येणार आहेत.

अंतर विशार हा आजार शेळ्या मेंढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.पावसाळ्यातील हिरवे गवत आल्यानंतर ते खाल्ल्यास डायरिया उद्भवू शकतो.परंतु लस दिल्यानंतर १४ दिवसांनी लसीचा प्रभाव सुरू होऊन हा आजार नियंत्रणात येतो. घटसर्प म्हंशींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. गळ्याला सूज येऊन ताप येत. असल्याचे लक्षण आहे. परंतु या लसीमुळे हे दोन्ही आजार पूर्णपणे नियंत्रणात येतील असा विश्वास पशुसंवर्धन अधिकारी शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या