Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधझकास अनिल कपूर

झकास अनिल कपूर

अनिल कपूर यांचा जन्म पंजाबी हिंदू कुटुंबात 24 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे निर्मल कपूर आणि चित्रपट निर्माता सुरिंदर कपूर यांच्या घरी झाला. चार मुलांपैकी तो दुसरा आहे. त्याचा मोठा भाऊ बोनी कपूर हा चित्रपट निर्माता आहे आणि लहान भाऊ संजय कपूर अभिनेता आहे.. अनिल कपूर यांचे शिक्षण अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल सुकर हायस्कूल, चेंबूर आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे झाले.

अनिल कपूर यांची ओळख 1980 ते 1990 दरम्यान त्यांच्या यशस्वी चित्रपटामुळे झाली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अनिल कपूरने उमेश मेहरा यांच्या हमारे तुम्हारे या छोट्याशा भूमिकेतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी दिग्गज बापू दिग्दर्शित वंश व्रुक्षम या 1980 च्या तेलगू चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्याच वर्षी, तो आणखी दोन हिंदी चित्रपटांमध्ये दिसला. एक बार कहो, हम पांच, शक्ती मध्ये छोटी भूमिका केल्यानंतर, त्याने मणिरत्नमच्या पल्लवी अनु पल्लवीमधून कन्नड चित्रपटात पदार्पण केले. वो सात दिन मध्ये त्यांचा पहिला हिंदी चित्रपट.

- Advertisement -

यश चोप्रा यांच्या मशाल चित्रपटातून अनिल यांना टपोरी ओळख मिळाली, ज्यासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. युद्ध या चित्रपटातील त्यांच्या एक दम झकास हा डायलॉग प्रसिद्ध आहे. मेरी जंग ज्यामध्ये त्यांनी न्यायासाठी लढणार्‍या एका संतप्त तरुण वकिलाची भूमिका साकारली ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले नामांकन मिळाले. मिस्टर इंडिया या चित्रपटात अनिल कपूरची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाने अनिल कपूर यांना सुपर स्टार बनविले. 1988 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर तेजाब या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांनी पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. 1989 मधे राम लखन बॉक्स ऑफिसवर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

अनिल यांचा पहिला इंग्रजी भाषेतील चित्रपट, स्लमडॉग मिलेनियर, 12 नोव्हेंबर 2008 रोजी प्रदर्शित झाला. स्लमडॉग मिलेनियरने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. 1984 मध्ये,अनिल कपूर यांनी सुनीता भवनानी या कॉस्च्युम डिझायनरशी विवाह केला, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे . त्यांची मोठी मुलगी सोनम कपूर एक अभिनेत्री आहे आणि त्यांची धाकटी मुलगी रिया कपूर एक चित्रपट निर्मात्या आहे. मुलगा हर्षवर्धन कपूर अभिनेता आहे. अनिल यांच्या संपूर्ण जीवनातील वाटचाल, त्यांच्या, स्वभाव, त्यांच्या वाट्याला आलेले भाग्य, आरोग्य इत्यादी अनेक बाबींवर प्रकाश टाकणारा आहे.

उजवा हात- अभिनेता अमिताभ असो, संजीव कुमार असो अथवा अन्य कसलेले अभिनेते असोत, त्यांच्याकडे असलेल्या अभिनयातली विविधता अनिल यांच्यात नाही, कारण अनिल यांच्या हातावरील मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेली नाही. अनिल यांच्या हातावरची मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेल्याने, कलाविष्काराला किंवा अभिनयातील विविध पैलू दाखविण्यात मर्यादा आहे. चंद्र ग्रह हा जसा मनाचा कारक आहे त्याप्रमाणे तो उपजत कलेचा सुद्धा कारक आहे. चंद्र ग्रहावर मस्तक रेषा लांबवर खाली मनगटाकडे उतरली असेल तर अशा व्यक्तीमध्ये काही ना काही कला गुण निश्चितच पाहावयास मिळतात. ते कला गुण निरनिराळ्या विषयाशी किंवा विविध कलांशी संबंधित असतात व हातावरील इतर ग्रह रेषांवरून व बोटांच्या ठश्यांवरून त्यांचे उपजत कलागुण नक्की कोणते ते ओळखता येतात. मस्तक रेषेची तळ हातावरची स्थिती व बोटांची टोके हे कला गुणात महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. अनिल कपूर यांच्या हातावरील सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेलेल्या मस्तक रेषेचे गुण हे अत्यंतिक मेहनत करणार्‍याचे आहेत त्यात वक्तशीर, निरंतर कामाचा ध्यास, कामाचा कंटाळा नाही व एका विशिष्ठ ध्येयाने हे लोक प्रेरित असतात. परंतु यांच्यात विविध कला गुणांचा वानवा असतो, त्यांचे कडे स्वयं प्रेरित कला किंवा कलाविष्कार नसतो. मंगळ रेषेकडे सरळ गेलेल्या मस्तक रेषेचे आणखी गुण म्हणजे हे लोक अत्यंतिक व्यवहारी असतात, यांचेकडून पैसे कधीच सुटत नाही, यांची मैत्री धनाशीच असते, स्वतःवर खर्च कदाचित करतील पण दुसर्‍यावर खर्च करताना अत्यंत चिंगूसपणा यांच्यात असतो. अनिल यांच्या फिटनेसचे सुद्धा कारक, मस्तक रेषा व करंगळीच्या समांतर हृदय रेषा व मस्तक रेषेच्या मध्ये असलेल्या मंगळ ग्रहांमुळे आहेत. हे लोक शिस्तीचे असतात. ठरवलेले काम नित्य नियमाने करतात व या त्यांच्याकडे असलेल्या गुणांमुळेच अनिल यांनी त्यांचा फिटनेस कायम ठेवला व त्यासाठी सातत्याने व्यायाम व खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले.

अनिल कपूर यांच्या हातावरील सरळ वरच्या मंगळ रेषेवर गेलेल्या मस्तक रेषेचे आपण गुणधर्म पाहिले. परंतु, संवादफेकी, अभिनय कौशल्य हे चंद्राचे गुण अनिल यांना मनगटाकडून उगम पावलेली एक सरळ प्रभाव रेषा मस्तक रेषेत जाऊन मिळत आहे. या चंद्र प्रभावी मस्तक रेषेत जाऊन विलीन होणार्‍या प्रभाव रेषेमुळे अनिल यांच्यात अभिनय कौशल्याचे गुण प्राप्त झाले आहेत. चंद्र ग्रहावरील मनगटाकडून सरळ वर मस्तक रेषेपर्यंत सरळ रेषेत जाणार्‍या सर्व प्रभाव रेषा व्यक्तीला प्रगल्भता प्रदान करतात, विद्वत्ता बहाल करतात.

अनिल यांच्या हातावरील सरळ जाणार्‍या मस्तक रेषे बरोबर चंद्रप्रभावी मस्तक रेषेत जाऊन विलीन होणारी प्रभाव रेषा नसती तर अनिल यांचेकडे अभियाचे अंग शून्य असते. अभिनयाचे अंग मस्तक रेषा दाखवीत नाही, तरीही अनिल यांच्या सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे जाणार्‍या मस्तक रेषेने त्यांच्या जिवनातं त्यांना यश मिळवून दिले आहे. या मस्तक रेषेच्या कारकत्वामुळे अनिलजी कधी दानधर्म करताना दिसले नाही, त्यांचा स्वभाव हिशोबी व कवडी चुंबकपणा असल्याने दान धर्मापासून ते कोसो दूर राहणार आहेत. अनिल कपूर भाग्यवान आहेत त्यांच्या घरात व कुटुंबात चित्रपट निर्मिती होत असल्याने त्यांचा चंदेरी दुनियेतील प्रवेश सोपा होता, कारण त्यांचे सर्व नातलग चित्रपट निर्मितीशी संबंधित आहेत. हातावरील भाग्य रेषा मणिबंधापासून उगम पावत आहे व ती थेट शनी ग्रहावर गेल्याने त्यांच्या आयुष्यात त्यांना आर्थिक चिंता नव्हती आणि नाही. बालपणीसुद्धा अनिल यांचे दिवस सुखात ऐश्वर्यात गेले, भाग्य रेषा मनगटापासून उगम पावत असताना ती आयुष्य रेषेपासून जितकी दूर असेल तितकी ती जास्त आर्थिक क्षमता देते. भाग्य रेषेचा उगम मनगटाकडून होताना ही रेषा आयुष्य रेषेच्या जितकी अधिक समीप जाईल तितकी आर्थिक क्षमता कमी कमी होत जाते. आयुष्य रेषेला खेटूनच भाग्यरेषा मनगटाकडून शनी ग्रहाकडे जात असेल तर बालपणी पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते.

अनिल जन्मतःच भाग्यवान आहेत, त्यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीशी लढा दयावा लागला नाही. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल किंवा घरात सुबत्ता असेल तर, व्यक्तीला त्याच्या जीवनात ध्येय गाठण्यास अडचण येत नाही. त्यांच्या जीवनात एखादे दुसरे अपयश आले तरी त्यांच्या कमाईवर कुटुंब अवलंबून नसल्याने त्यांना परत यश प्राप्त करण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करू शकतात. हस्तरेखाशास्त्रात मनगटाकडून बोटांच्या खाली किंवा हातावरील कुठल्याही ग्रहावर एक रेषा जाऊन पोहोचत असेल तर तो ग्रह अत्यंतिक शुभ फल देतो. तसेच हातावरील मुख्य रेषेतून ग्रहांवर जाणार्‍या रेषेंचा उगम होत असेल तर अशा वेळेस तो ग्रह दुप्पट शुभकारी फल देतो. भाग्य रेषेतून उगम पावणार्‍या रेषा हातावर असतील व त्या बोटांच्या खाली असलेल्या ग्रहांवर जाऊन थांबत असतील तर ग्रहांची शुभदायी फल देण्याची ताकद तिप्पट वाढते. म्हणजे भाग्य रेषेतून उगम पावणार्‍या व बोटांच्याखाली जाऊन थांबणार्‍या रेषा अत्यंतिक भाग्यवान व्यतीच्या हातावर पहावयास मिळतात. त्यापैकी अनिल कपूर हे एक आहेत. अनिल यांच्या हातावरील भाग्य रेषेतून रवी व बुध ग्रहावर जाणारी एकच रेषा असून या रेषेने रवी व बुध ग्रह अत्यंतिक शुभकारक केले आहेत. भाग्य रेषा शनी ग्रहावर जाऊन थांबली आहे व याच भाग्य रेषेतून रवी रेषा तिसर्‍या व चौथ्या बोटांच्या पेर्‍यात जाऊन थांबली आहे, ही रेषा आंतरराष्ट्रीय मान सन्मान प्रदान करते. भाग्य रेषेतूनच बुध ग्रहाकडे जाणारी रेषा आहे, या रेषेला मस्तक रेषेपाशी दोन फाटे फुटले आहेत, एक फाटा बुध ग्रहाकडे व दुसरा रवी ग्रहाकडे वळाला आहे, रवी ग्रहाकडे गेलेल्या रवी रेषेने कलागुण दिले , तसेच त्यांच्या जीवनात कायम मान सन्मान प्रदान केला आहे. अनिल यांच्या हातावरील बुध ग्रहावर जाऊन पोहोचलेल्या एका रेषेच्या फाट्याने त्यांच्या अंगी हुशारी व चलाखी दिली आहे. अनिल यांना बुध रेषेने, स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी, मी कसा व किती हुशार, मेहनती, तंदुरुस्त, अनुभवी आहे याचे प्रदर्शन करण्याची खुबी दिली आहे. अनिल यांच्या हातावर मोजक्याच रेषा आहेत व त्या सर्व भाग्यकारक आहेत, हातावरील गुरु वलय हे त्यांना नीतिवान बनवीत आहे व त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे. अनिल कपूर किमान वयाच्या 70 वर्षांपर्यंत अथक काम करीत राहणार आहेत, त्यांची आयुष्य रेषा निरोगी आहे व अंगठा मजबूत जोमदार असल्याने त्यांनी योजलेली कामे ते पूर्णत्वास नेत आहेत व नेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या