Friday, April 26, 2024
Homeजळगावअमृत जलवाहिनी जोडणीचे कामे वाढीव वस्त्यांमध्ये रेंगाळले

अमृत जलवाहिनी जोडणीचे कामे वाढीव वस्त्यांमध्ये रेंगाळले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात अमृत योजने (Amrit Yojana) अंतर्गत नविन जलवाहिनी (new water channel) टाकण्याचे काम अंतिम -work final stage= टप्यात असले तरी शहरातील वाढिव वस्त्यांमध्ये अजून ही अमृतचे पाणी (Amrit water) पोहचलेले नसल्यामुळे मनपा प्रशासना (Municipality administration) बाबत नागरिकांमध्ये (Anger among citizens) रोष व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

शहरातील कानळदा रस्त्यावरील केसी पार्कच्या पुढील श्रीकृष्ण कॉलनी, दत्तात्रेय नगर, हरिओम नगर, रोहन वाडी, राजाराम नगर, विजय नगर आदी वसाहतींमधील हजारो नागरिकांचा रहिवास असून सुध्दा त्यांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. अनेक भागात जलवाहिनी टाकण्याचे कामे झाली आहे तर काही वसाहतीमध्ये अजून जलवाहिनी अद्याप टाकलेले नाही. परंतू ज्या भागात जलवाहिनी टाकण्याचे काम झाले आहे त्या भागात मुख्य जलवाहिनीला जोडून नागरिकांना नळ कनेेक्शन दिलेले नाही.

पाण्यासाठी दुसर्‍या कॉलन्यांमध्ये

कानळदा रस्त्यावरील वाढीव वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या दारोदारी जावून पाणी मागावे लागत आहे. त्यासाठी लहान मुलांपासून तर मोठ्यांना डोक्यावर हंडा-कळशी, कॅन घेवून पिण्याचे पाणी डोक्यावर आणावे लागत आहे.

पाणी पुरवठा अधिकार्‍यांचे आश्वासनाची बोळवण

कानळदा रस्त्यावरील वस्त्यांमध्ये नागरिकांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंत्यांकडे अनेकदा तक्रार करून जलवाहिनी जोडण्याचे मागणी केली. परंतू नागरिकांना वेळोवेळी पुढील महिन्यात तुम्हाला पाणी मिळेल असे आश्वासन गेल्या दोन वर्षापासून नागरिकांना हे अधिकारी देत आहे.

शामनगरातही पाण्यासाठी वणवण

हरिविठ्ठल नगर शेजारी तसेच गिरणा पंपीग रोड लगत असलेल्या शाम नगरात अर्ध्या भागात पाणी पुरवठा होतो. परंतू अर्ध्या भागात जलवाहिनी टाकणीचे काम झाले आहे. मुख्य रस्त्यावरील झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम थांबलेले आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडून याबात कारवाई झालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या