Thursday, April 25, 2024
Homeनगरभ्रष्टाचाराला ‘अमृत’चे खतपाणी

भ्रष्टाचाराला ‘अमृत’चे खतपाणी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

सव्वाशे कोटी रुपयांची अमृत योजना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप करत त्याविरोधात शिवराष्ट्र सेनेने

- Advertisement -

आज बुधवारपासून महापालिकेत आमरण उपोषण सुरू केले आहे. कररूपाने भरलेल्या नगरकरांच्या पैशावर योजनेचे ठेकेदार दरोडा टाकत असल्याचा आरोप शिवराष्ट्र सेनेने संतोष नवसुपे यांनी केला आहे. महासभेत एकमेकांच्या अंगावर तुटून पडणारे नगरसेवक योजनेच्या विषयावर चकार शब्दही बोलत नाही. करारानुसार महापालिका कर्मचारी ठेकेदाराकडून काम करून घेत नाही.

भुयारी गटार योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आहे. ठेकेदारवर देखरेख करणारे इंजिनिअर घरात बसून काम करतात, अथवा रजेवर असतात. त्यामुळे ठेकदाराचे मनमानी काम सुरू असल्याचा आरोप नवसुपे यांनी यावेळी केला.

महापालिकेने ठेकेदाराला अटी व शर्तीचा भंग केला म्हणून दंड करावा, सबठेकेदार नियुक्त करण्यास परवानगी देणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यावर कारवाई करावी, ठेकेदाराने विविध गोष्टींचा भंग केल्याप्रकरणी त्याचा काळ्या यादीत समावेश अशी मागणी नवसुपे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या