सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या फरकाची रक्कम मिळावी म्हणून 30 मे रोजी बेमुदत धरणे आंदोलन

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगानुसार थकीत फरक, उपदान, रजावेतन, कालबध्द पदोन्नतीचा फरक तसेच वेतन फरकाची रक्कम त्वरीत मिळावी म्हणून नगरपालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन तसेच समक्ष भेटून तोंडी चर्चा करून मागण्या करणेबाबत विनंती केली होती. मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे 30 मे 2022 रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा श्रीरामपूर नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन यांच्यावतीने देण्यात आला आहे.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगानुसार थकीत फरक, उपदान, रजावेतन, कालबध्द पदोन्नतीचा फरक तसेच वेतन फरकाची रक्कम त्वरीत मिळावी म्हणून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दोन दिवस नगरपालिकेसमोर उपोषण करावे लागले होते. प्रत्येक वेळेस आपण आम्हास पोकळ आश्वासने देवून तोंडाला पाने पुसली. प्रत्येकवेळी आपण लेखी व तोंडी स्वरूपात आम्हास कळविले आहे की, श्रीरामपूर नगरपालिकेलव शासनाकडून 2017-18, 2018-19 व 2019-20 या कालावधीत सहाय्यक अनुदान कमी प्राप्त झालेले आहे.

सहाय्यक अनुदान फरकाची रक्कम रुपये 4.50 कोटी येणे असून सदरचे अप्राप्त अनुदान मिळणेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. सदरची रक्कम प्राप्त होताच तुमची देणी पूर्ण अदा करणेत येईल असे लेखी व आस्वासने वेळोवेळी आम्हास दिले होते. नगरपरिषदेने शासनाकडे पाठविलेल्या अप्राप्त अनुदानापैकी 3.89 रुपये नगरपरिषदेस शासनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत.तरी अद्यापपावेतो आपण आम्हास विषयांकीत थकीत रकमा अदा केलेल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजाने दि. 30 मे 2022 पासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणेत येईल असा इशारा रमेश अपील, यशवंत देवधर, शांताराम बोर्डे, भानुदास जाधव, गोविंद लांडे, देविदास बोर्डे, गोपाळ गायधने, रमा यादव, सुर्यभान सातदिवे, भानुदास शेळके,भानुदास थोरात, रघुनाथ शेळके आदींनी दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *