Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश…तर जागतिक आरोग्य संघटनेचा निधी कायमचा बंद करू – ट्रम्प

…तर जागतिक आरोग्य संघटनेचा निधी कायमचा बंद करू – ट्रम्प

सार्वमत

नवी दिल्ली – करोना  संकटात अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेमधील तणाव वाढतच आहे. करोनाची माहिती लपवल्याचा आरोप करत यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला आहे. आता ट्रम्प यांनी येत्या 30 दिवसांत संघटनेत सुधारणा करा नाहीतर तुमचा निधी कायमचा बंद करू असा पत्राद्वारे जागातिक आरोग्य संघटनेला पुन्हा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांना हे पत्र लिहिले आहे. पत्रात ट्रम्प यांनी संघटनेच्या चुकांची शिक्षा संपूर्ण जग भोग असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यापदावरून हटवण्याचा देखील इशारा दिला आहे.

- Advertisement -

पत्रात म्हटले आहे, जागतिक आरोग्य संघटनेतील सदस्यत्वावरून अमेरिका पुनर्विचार करू शकतो. तसेच आतापर्यंत संकटावर कोणतेही ठोस उपाय नाहीत. संयुक्त राष्ट्राचा हा आरोग्य विभाग चीनच्या हातात बाहुल बनला आहे, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर केला आहे.

तसेच 2019 मध्ये करोना विषाणूबद्दल वुहानकडून आलेल्या अहवालांकडे जागातिक आरोग्य संघटनेने दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी पत्राद्वारे केला आहे. ट्रम्प यांच्या मते, डिसेंबर 2019 मध्ये विषाणू एका माणसात दुसर्‍या माणसात पसरत असल्याचे माहित होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले आणि जगाला इशारा देखील दिला नाही. तसेच कोणत्याही देशाला चोवीस तासांत अशा आजाराबाबत अहवाल द्यावा लागतो. पण चीनने तसे केले नाही.  दरम्यान अमेरिकेत करोनाचा कहर सुरूच असून 15 लाखांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी 91 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या