Thursday, April 25, 2024
Homeनगरमनपाचे 20 लसीकरण केंद्र राहणार बंद

मनपाचे 20 लसीकरण केंद्र राहणार बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने प्रभागनिहाय सुरू केलेले लसीकरणाचे 20 उपकेंद्र बंद केले आहेत. नगरसेवकांच्या मागणीनंतर शहरातील मंगल कार्यालयात लसीकरणाची ही उपकेंद्रे सुरू केली होती. राजकीय आरोपात अडकलेली ही उपकेंद्र महापालिकेने बंद केली आहेत. कोणत्याही उपकेंद्रावर लस उपलब्ध होणार नाही, असे स्पष्टपणे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

- Advertisement -

दरम्यान गत तीन दिवसापासून बंद असलेले शहरातील लसीकरण केंद्र शुक्रवारपासून सुरू झाले. आज (शनिवारी) प्रत्येक केंद्रावर 200 डोस दिले जाणार आहे. 45 वर्षापुढील नागरिक व फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा 84 दिवसांनंतरचा दुसरा डोस दिला जाणार आहे. मनपाच्या आठ केंद्रांवर लसीकरण सुरू असणार आहे. यामध्ये महात्मा फुले, तोफखाना, सावेडी, केडगाव, आयुर्वेद, नागापूर, भोसले आखाडा, मुकुंदनगर या केंद्रांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या