अंबड वासियांचा अर्धनग्न पायी मोर्चा स्थगित; ‘हे’ आहे कारण

jalgaon-digital
2 Min Read

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad MIDC) पोलीस ठाण्याच्या (Police Station) कामासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता १५ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मुंबईला अर्धनग्न पायी मोर्चाला निघालेल्या आंदोलनकर्त्यांना आमदार सीमा हिरे (Sima Hire) यांच्या मध्यस्थीने दिले…

अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे, दत्तनगर, घरकुल योजना, कारगिल चौक आदी परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या परिसरापासून अंबड पोलीस ठाणे हे दूर असल्याने घटना घडून गेल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचायला उशीर लागतो आणि त्या काळात गुन्हेगार त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी ठरतो.

यामुळे परिसरात तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी तसेच चोऱ्यांचे प्रमाण थांबावे याकरिता केल्या कित्येक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती, मात्र वारंवार मागणी करूनही या ठिकाणी पोलीस ठाणे न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे ,रामदास दातीर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी नाशिक ते मुंबई असा अर्धनग्न मोर्चा एक्सलो पॉईंट पासून सुरुवात केला.

सुरुवातीला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अर्धनग्न पायी मोर्चा गरवारे पॉईंट पर्यंत पोहोचला असताना नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांची मनधरणी करत त्यांची भेट जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी घडवून आणली.

सुरगाणा ग्रामस्थांनी वाचला पालकमंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा; चर्चेनंतर घेतला ‘हा’ निर्णय

यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी पंधरा दिवसात सदर पोलीस ठाण्याचा प्रश्न मार्गी लावू मात्र दोनच दिवसात येथे बंद असलेल्या सर्व पोलीस चौकी कार्यान्वित करण्याचे संबंधित विभागाला आदेशित केले. यामुळे पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत त्यांचे आभार मानले.

अंबड वासियांच्या अर्धनग्न पायी मोर्चात नवा ट्विस्ट

यावेळी अरुण दातीर, शरद कर्डेल, महेश दातीर, राहुल राऊत, नितीन दातीर, समाधान शिंदे, अजय पाटील, मुन्ना दोंदे, संदीप तांबे, राहुल दोंदे, शांताराम फडोळ, त्र्यंबक मोरे, भास्कर दातीर, अनिल वाघमारे, प्रतीक करडे, किरण गायकवाड आदींसह परिसरातील राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *