Tuesday, April 23, 2024
HomeनाशिकVideo : टवाळखोरांनो आता तुमची गय नाही; अंबड पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

Video : टवाळखोरांनो आता तुमची गय नाही; अंबड पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलिसांतर्फे पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत विविध ठिकाणी टवाळखोरांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. वावरे महाविद्यालय बाहेर देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवल्याने टवाळखोरीला आळा बसेल असे नागरिकांतर्फे बोलले जात आहे….

- Advertisement -

अंबड पोलीस ठाण्यातील (Ambad Police Station) नवनियुक्त वपोनी भगीरथ देशमुख (SPI Bhagirath Deshmukh) यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी तसेच पायी पेट्रोलिंग सुरू केली आहे.

यामध्ये संभाजी स्टेडियम (Sambhaji Stadium), पवन नगर स्टेडियम (Pawan nagar Stadium), पाटील नगर स्टेडियम (Patil Nagar Stadium), महाकाली चौक (Mahakali Chauk) आदी विविध परिसरामध्ये टवाळखोरी करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

तसेच अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police station) हद्दीत असलेल्या फास्टफूडच्या गाड्यांवर अवैधरित्या मद्यपान करणाऱ्या मद्यपींना देखील चांगलाच प्रसाद दिला.

उत्तम नगर येथे असलेल्या वावरे महाविद्यालयाच्या बाहेर टवाळखोर मुलींची छेडछाड तसेच हाणामारीचे प्रकार करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलला.

महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे महाविद्यालय सोडून पवन नगर स्टेडियम येथे विनाकारण बसले असताना त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना देखील पोलीस ठाण्यात बोलवुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीकडे वळू नये असा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे वपोनी देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या