Wednesday, April 24, 2024
Homeजळगावपाणलोट क्षेत्रात संततधार : हतनुरचे सर्व 41 दरवाजे उघडले

पाणलोट क्षेत्रात संततधार : हतनुरचे सर्व 41 दरवाजे उघडले

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

भुसावळसह परिसरात गेल्या चार दिवसांपासून (four days) तापी नदी व तीच्या उगमस्थळावर (Tapi River and its source) पाऊस (rain) सुरू आहे. मात्र गेल्या चोविस तासात पावसाचे प्रमाण वाढल्याने (rainfall increases) धरणाच्या पाणी साठ्यात (water reservoir of the dam) अवघ्या काही तासात पाण्याची पातळी ही पावणेदोन मिटरने वाढली. खबरदारीचा इशारा देवून धरण प्रशासनाने रात्री हतनुरचे (Hatnur) 41 दरवाजे (41 doors fully opened)प्रथमच पुर्ण उघडले असून तापी नदीला मोठा पूर (Big flood on Tapi river) आला आहे.

- Advertisement -

चार दिवसांपासून पाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पाटबंधारे विभागाने या पावसाळ्यात (दि.11 जुलै) 22 दरवाजे उघडून पूर्ण क्षमतेने उघडले होते. दरम्यान आज (दि.13 रोजी) पहाटे पासून पावसाने वेग घेतला व धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून पाण्याचा विसर्ग 1 लाख 25 हजार क्युसेस प्रमाणे सोडण्यात येत आहे. दरम्यान 75 हजार क्युसेसच्या वर विसर्ग झाल्यावर संपूर्ण 41 दरवाजे उघडले जातात. मात्र या पावसात दोन तासात विसर्ग हा 1 लाख 25 क्युसेसने वाढला आहे.

हतनूर धरणाला जूने 36 दरवाजे आहेत. युतीच्या कार्यकाळात एकनाथराव खडसे पाटबंधारे मंत्री असतांना पाण्याची साठवण क्षमता वाढवून उर्ध्व प्रकल्पात पाच दरवाजे नव्याने उभारले आहेत. या नवीन दरवाजाचेे मिळून एकूण 41 दरवाजे झाले आहेत.

पाऊस याच वेगाने पडत राहिला तर रात्री धरणाचे उर्वरित दरवाजे देखील उघडावे लागू शकतात, असे हतनूर शाखा अभियंता एस.जी. चौधरी यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले. दरम्यान रात्री 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले असल्यामुळे तापी नदीला मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना कोतवालामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या