नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळावी

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) नगर, शेवगाव (Shevgav), पाथर्डी (Pathardi) तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटी (Cloudburst) सदृश पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान (Crops Loss) झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे (Punchnama) करून शेतकर्‍यांना 50 हजार रुपये तातडीची मदत (Help) द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे (Nitin Patare) यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे पशुधन वाहून गेले. अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. शासनाकडून रोख स्वरूपात मदत न मिळाल्यास शेवगाव नगर पाथर्डी येथील शेतकर्‍यांसह अखिल भारतीय छावा संघटना बैलगाडी मोर्चा काढणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर नितीन पटारे, अमोल वाळुंज, किशोर शिकारे, सचिन खंडागळे, गणेश गायकवाड, सुरेखाताई सांगळे, किरण फटांगरेे आदींच्या सह्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *