Friday, May 10, 2024
Homeनगरघरपोहच दारू देणार्‍यास अटक

घरपोहच दारू देणार्‍यास अटक

अहमदनगर |प्रतिनिधी |Ahmednagar

भोयरे पठार (ता.नगर) गाव आणि परिसरात एक व्यक्ती घरपोहच दारू विकत आहे, अशी माहिती गुप्त बातमीदार मार्फत मिळाल्यावरून नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून भोयरे पठार ते सारोळा आडवाई जाणारे रस्त्यालगत माळवाडी येथे आरोपी संपत घमाजी उरमुडे (वय 49, रा . भोयरे पठार) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या बॉक्ससह 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, भोयरे पठार गावात संपत घमाजी उरमुडे हा देशी-विदेशी दारु ब्रिकी करत आहे. सानप यांनी तात्काळ पथकासह भोयरे पठार ते सारोळा आडवाई जाणार्‍या रस्त्यावर माळवाडी येथे सापळा लावला. संपत उरमुडे हा हिरो होंडा कंपनीची एच.एफ.डिलक्स (एम. एच. 16 ए.जी. 6678) दुचाकीवर देशी-विदेशी दारुच्या बाटल्या या गोणीत भरुन येत होता.

त्यास थांबण्याचा इशारा करताच तो पळून जावू लागला. त्यास पाठलाग करून पकडले, त्याच्या ताब्यात मॅकडॉल, रमच्या 180 मिलीच्या 24 सिलबंद बाटल्या, दुचाकी असा 22 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरूद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक राहुल शिंदे, प्रमिला गायकवाड, जगदीश जंबे, ज्ञानेश्वर खिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या