Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकहून आता २८ शहरांसाठी विमानसेवेचा थेट कनेक्ट

नाशिकहून आता २८ शहरांसाठी विमानसेवेचा थेट कनेक्ट

नाशिक | Nashik

शहरातून हैदराबाद, बंगळूरू, अहमदाबाद, दिल्ली व पुणे या शहरांसह आता बेळगावला जोडणारी ३ कंपन्यांकडून विमानसेवा सुरूझालेली आहे.

- Advertisement -

तसेच स्पाइस जेटकडून सुरू असलेल्या दिल्ली व हैदराबाद विमानसेवेमुळे नाशिककरांना देशामधील आणखी २८ शहरांचे थेट कनेक्ट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

त्यासोबतच अजमेर अमृतसर, बागडोगरा, दरभंगा, डेहराडून, दुर्गापुर, ग्वालियर, जालंधर, जबलपूर, झारसुगुडा, रांची, पटना, विजयवाडा या शहरांसाठी ही जोडली विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी अवघ्या काही तासांमध्ये देशातील विवीध भगांसाठी प्रवास शक्य असून, ही एक पर्वणीच ठरणार आहे.

नाशिक हुन सुरू असलेल्या हैदराबाद आणि दिल्ली विमान सेवांना २८ शहरे कनेक्ट केल्याने नाशिकहून आता थेट या शहरांमध्ये पोहोचता येणार आहे.

या सुविधेमुळे नाशिककरांना पर्यटन, उद्योग व व्यवसाय क्षेत्राला लाभ मिळणार आहे. तर, पर्यटनाच्या दृष्टीने मागणी करण्यात आलेल्या लेह, मनाली, तिरुपती, उदयपूर, धर्मशाळा, विशाखापट्टनम, श्रीनगर यासह २८ शहरांमध्ये थेट कनेक्ट उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या