Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकइस्प्लियर स्कुलच्या विद्यार्थ्यांने बनवले 'तेज'विमान

इस्प्लियर स्कुलच्या विद्यार्थ्यांने बनवले ‘तेज’विमान

नवीन नाशिक | New Nashik

इस्प्लियर शाळेत दहावीत शिक्षण घेणाऱ्या चिमुरड्याने लॉकडाऊन काळात थर्माकॉल च्या साहाय्याने विमान तयार केले आहे. या चिमुरड्या चा हा प्रयोग परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

तेज भाऊसाहेब दातीर असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अंबड गावानजीक कम्फर्ट झोन सोसायटीत तो राहतो आहे. शहरातील नावाजलेल्या इस्प्लियर शाळेत तो दहावीचे शिक्षण घेत आहे. तेज ने लॉकडाऊन काळात वेळेचा सदुपयोग करत अवघ्या एक ते दीड किलो वजनाचे विमान तयार केले.

हे विमान थर्माकोलच्या सहाय्याने तयार करण्यात आले असून त्याला आर सी प्लेन असे म्हटले जाते, रिमोटच्या सहाय्याने हे विमान आकाशात भरारी घेत आहे. जमिनीपासून वीस ते पंचवीस फुटावर व रिमोटच्या कार्यक्षेत्रात हे विमान अगदी सहज रित्या उडवता येते.

तेजसच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. सध्या लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी देखील हे विमान आकर्षणाचा मुद्दा ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या