Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश‘असे’ कपडे घातल्यास जाणार नोकरी

‘असे’ कपडे घातल्यास जाणार नोकरी

नवी दिल्ली | New Delhi –

एअर इंडियाने वेषभूषा नियमावली जाहीर केली असून नव्या नियमांप्रमाणे कर्मचार्‍यांना

- Advertisement -

Air India Dress Code for Employees

टी-शर्ट वा जीन्स पँट अशा पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे परिधान करुन कार्यालयात उपस्थित राहता येणार नाही. संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्यास नोकरीवर गदा येऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. Air India

एअर इंडियात कोणत्याही पदावरील कर्मचारी हा उद्योगाचा चेहरा असून, त्याच्या वर्तणुकीचा संपूर्ण प्रतिमेवर परिणाम होत असतो, असे एअर इंडियाने कर्मचार्‍यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. हा नियम नोकरीत कायम असलेले कर्मचारी, कंत्राटी, पूर्ण वेळ वा अर्धवेळ तसेच प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांसाठी नियम लागू करण्यात आला आहे. महिला कर्मचार्‍यांनी भारतीय आणि योग्य असा पाश्चात्त्य वेष परिधान करावा. पारदर्शी कपडे घालू नयेत, असे नियमावलीत नमूद केले आहे. यावर बंदी : पोलो (एक प्रकारचे टी शर्ट), हवाई चप्पल, सँडल्स, छिद्र वा ढिगळ असलेले जीन्स (रिप्ड जीन्स), आखूड कपडे (शॉर्टस्), तंग कपडे (टू टाईट वेअर).

- Advertisment -

ताज्या बातम्या